मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Palak Chole: थंडीत घ्या गरमा गरम पालक छोलेचा आस्वाद, ट्राय करा ही पंजाबी रेसिपी

Palak Chole: थंडीत घ्या गरमा गरम पालक छोलेचा आस्वाद, ट्राय करा ही पंजाबी रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 31, 2023 08:32 PM IST

Punjabi Style Recipe: जर तुम्हाला या नेहमीची पालकाची भाजी खाण्याचा कंटाळा आला असेल, तर पालक छोलेची ही चवदार पंजाबी रेसिपी ट्राय करा. डिनरसाठी एक चांगला पर्याय आहे.

पालक छोले
पालक छोले

Palak Chole Recipe: हिवाळा सुरू होताच लोकांच्या घरात हिरव्या भाज्यांचा सुगंध दरवळू लागतो. मेथी, पालक सारख्या हिरव्या भाज्या या ऋतूत खायला खूप चवदार असतात. पण जर तुम्हाला या नेहमीच्या हिरव्या भाज्या खाण्याचा कंटाळा आला असेल, तर पालक छोलेची ही चविष्ट पंजाबी रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी खायला टेस्टी तर आहेच पण बनवायलाही खूप सोपी आहे. ही रेसिपी तुम्ही जीरा राइस, नान किंवा तंदुरी रोटीसोबत सर्व्ह करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

पालक छोले बनवण्यासाठी साहित्य

- छोले - २ वाट्या (रात्रभर भिजवलेले)

- पालक - अर्धा किलो

- लसूण - १० कळ्या

- धने पावडर- २ चमचे

- काश्मिरी लाल मिरची - १ टीस्पून

- जीरे- १ टीस्पून

- लवंगा- ३

-मोठी वेलची- १

-लहान वेलची - १

- काळी मिरी - ४

- कांदा - २ बारीक चिरलेला

- टोमॅटो - ३ बारीक चिरलेला

- हिरवी मिरची - ४ बारीक चिरलेली

- आले पेस्ट - १/२ टीस्पून

- मोहरीचे तेल - ३ टेबलस्पून

- दालचिनी - २ तुकडे

- तमालपत्र -१

- चहापत्ती - १ टीस्पून

- बटर - १ टीस्पून

- मीठ - चवीनुसार

पालक छोले बनवण्याची पद्धत

पालक छोले बनवण्यासाठी प्रथम रात्रभर भिजवलेल्या चण्यामध्ये १ कप उकळलेली चहापत्तीचे पाणी (गाळल्यानंतर), लवंगा, छोटी-मोठी वेलची, तमालपत्र, काळी मिरी, दालचिनी आणि लसूण घाला. यानंतर हे मिश्रण कुकरमध्ये ठेवून ५-६ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा. कुकरची वाफ संपली की लसूण सोडून बाकीचे खडे मसाले चण्यांमधून काढून वेगळे करा. यानंतर पालक उकळून बारीक करून घ्या.

आता कढईत मोहरीचे तेल गरम करून त्यात जिरे, आले पेस्ट घालून एक मिनिट परतून घ्या. आता त्यात कांदा घालून मध्यम आचेवर कांद्याचा रंग बदलेपर्यंत परता. कांदा परतून झाल्यावर त्यात टोमॅटो, धनेपूड, काश्मिरी मिरची, मीठ आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. थोडा वेळ मंद आचेवर शिजल्यानंतर तेल सुटू लागले की त्यात चणे आणि पालक घाला. मंद आचेवर झाकून ठेवा आणि १० मिनिटे राहू द्या. मध्ये मध्ये ढवळत राहा, म्हणजे भाजी जळणार नाही. आवश्यकते नुसार पाणी घाला आणि थोडा वेळ उकळू द्या. उकळायला लागल्यावर गॅस बंद करा. शेवटी चण्यामध्ये बटर घालून गरमा गरम रोटी किंवा भाताबरोबर सर्व्ह करा.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या