मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Bread Halwa Recipe: ब्रेडपासून बनवा चविष्ट हलवा! फॉलो करा सोपी रेसिपी
रेसिपी
रेसिपी (Freepik )

Bread Halwa Recipe: ब्रेडपासून बनवा चविष्ट हलवा! फॉलो करा सोपी रेसिपी

19 January 2023, 13:56 ISTTejashree Tanaji Gaikwad

Sweet Recipe: ब्रेड हलवा बनवायला खूप सोपा आहे आणि तोंडाची चव बदलण्यासाठी ही एक उत्तम खाद्यपदार्थ आहे.

हिवाळ्यात हलवा खाण्याची मजाच वेगळी असते. तुम्ही गव्हाच्या पिठापासून, रव्याचा हलवा खाल्ला असेल. पण तुम्ही कधी ब्रेडचा हलवा खाल्ला आहे का? नसेल तर आज आम्ही तुम्हाला ब्रेड हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जर ब्रेड घरात उरला असेल आणि तुम्हाला त्याचा योग्य उपयोग समजत नसेल तर तुम्ही झटपट ब्रेड हलवा तयार करू शकता. ब्रेड हलवा रात्रीच्या जेवणानंतर किंवा सकाळी नाश्त्यातही खाऊ शकता. ब्रेड हलवा बनवायला खूप सोपा आहे आणि तोंडाची चव बदलण्यासाठी ही एक उत्तम खाद्यपदार्थ आहे. बर्‍याच घरात ब्रेड येतो आणि कधी-कधी तो उरला की खराब होण्याची भीती असते, अशा परिस्थितीत जर तुम्हाला ते लवकर वापरायचा असेल आणि ती संपवायची असेल, तर ब्रेड हलवा हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.

ट्रेंडिंग न्यूज

ब्रेड हलवा बनवण्यासाठी साहित्य

ब्रेडचे तुकडे - १०

दूध - दीड कप

मलई - ४ टेस्पून

सुक्या फळे - २ टेस्पून

वेलची पावडर - १/२ टीस्पून

देसी तूप - २ टीस्पून

साखर - १ कप

ब्रेड हलवा बनवण्यासाठीची कृती

ब्रेड हलवा बनवण्यासाठी प्रथम ब्रेडचे तुकडे घ्या आणि चाकूच्या मदतीने त्यांच्या चार कडा कापून वेगळे करा.

आता ब्रेडचा उरलेला पांढरा भाग तुकडे करून घ्या. एका भांड्यात वेगळे ठेवा.

आता एका पातेल्यात १ चमचा देशी तूप टाकून गरम करा.

तूप गरम होऊन वितळल्यावर त्यात चिरलेला ड्रायफ्रुट्स टाकून तळून घ्या. सुका मेवा सुमारे १ मिनिट भाजल्यानंतर एका भांड्यात काढा आणि बाजूला ठेवा.

आता कढईत पुन्हा १ चमचा तूप टाका आणि तूप वितळले की त्यात चिरलेले ब्रेडचे तुकडे टाकून भाजून घ्या. ब्रेडचे तुकडे रंग सोनेरी होईपर्यंत चांगले तळून घ्या.

यानंतर कढईत दूध घाला आणि ब्रेडचे तुकडे मोठ्या चमच्याने दुधात चांगले मॅश करून शिजवा. आता हे मिश्रण २-३ मिनिटे शिजू द्या.

यानंतर ब्रेडच्या हलव्यामध्ये चवीनुसार मलई आणि साखर घालून चांगले मिक्स करावे. आता हलवा आणखी २ मिनिटे शिजवा जेणेकरून साखर हलव्यात चांगली मिसळेल.

यानंतर हलव्यात आधी तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून चांगले मिसळा.

हलवा आणखी १ मिनिट शिजल्यानंतर गॅस बंद करा. चवीने भरलेली ब्रेड हलवा तयार आहे.

सर्व्हिंग बाऊलमध्ये ठेवा आणि नाश्त्यासाठी सर्व्ह करा.

विभाग