Snacks Recipe: नवीन वर्षात घरीच बनवा हे ४ चविष्ट व्हेज स्नॅक्स, पार्टीची मजा होईल द्विगुणित!
New Year Party Snacks Ideas: नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी लोकांनी सुरू केली आहे. पण स्नॅक्स आणि कॉकटेलशिवाय पार्टीची मजा नाही.
Recipe: ख्रिसमसनंतर लोक नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करतात. नवीन वर्षाच्या पार्टीत कॉकटेल किंवा स्नॅक्स नाहीत असं कसं होईल. जेवढं छान डेकोरेशन, गेम्स आणि गेस्ट असतील तेवढंच छान जेवण तर हवंच. ३१ डिसेंबरला (31st December 2022) अनेक ऑर्डर्स असतात त्यामुळे बाहेरून पदार्थ ऑर्डर करण्याऐवजी घरीच तुम्ही काही पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की नवीन वर्षासाठी तुम्ही घरच्या घरी चविष्ट व्हेज स्नॅक्स बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या स्नॅक्स रेसिपी.
ट्रेंडिंग न्यूज
स्टफ्ड चीझी मशरूम (Stuffed Cheesy Mushrooms)
पांढर्या मोठ्या मशरूममध्ये किसलेले चीझ भरून तुम्ही चवदार स्नॅक्स बनवू शकता. चीझ,पनीर किसून त्यात कांदा, काली मिरी असे आवडीचे वेगवगळे मसाले आणि भाज्या टाकून मिश्रण बनवा. हे मिश्रण मशरूममध्ये भरा आणि बेक करा.
राजमा कबाब (Rajma Kebab)
अनेकांना राजमा लावतो. राजमा उकडून चांगले मॅश करून त्यात उकडलेला बटाटा घाला. यामध्ये कांदा, सिमला मिरची, हिरवे वाटणे आणि सगळे मसाले टाकून मिश्रण बनवा. या मिश्रणाचे छोटे गोळे बनवून त्याला कबाबचा आकार द्या. या कबाबला शॅलो फ्राय करा.
पनीर पॉकेट (Paneer Pockets)
चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर वापरून पनीरचा पॉकेट बनवता येतो. ही डिश तुम्ही पॅनमध्येही बनवू शकता. पफी पनीरची ही डिश खूप चवदार लागते.
बटाटा पॅनकेक्स (Potato Pancakes)
हे बनवण्यासाठी बटाटे चांगले उकडा. त्यात मसाले घाला आणि त्यात पीठ घाला. नंतर तव्यावर पॅनकेक्स बनवा आणि चटणी सोबत खा.
संबंधित बातम्या
विभाग