मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Eye Makeup Tips: टपोरे डोळे दिसण्यासाठी मेकअप कसा करायचा? जाणून घ्या बेसिक हॅक्स

Eye Makeup Tips: टपोरे डोळे दिसण्यासाठी मेकअप कसा करायचा? जाणून घ्या बेसिक हॅक्स

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Oct 30, 2022 12:59 PM IST

Basic Makeup Hacks: तुम्ही मेकअप करताना काही बेसिक टिप्स पाळल्या नाहीत तर पूर्ण लूक खराब होऊ शकतो.

आय मेकअप
आय मेकअप (Freepik)

मेकअप केल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या काही काळ लपतातच सोबतीला तुमच्या चेहऱ्याचे फीचर्सही चांगल्या प्रकारे हायलाइट होतात. परंतु मेकअप करताना काही बेसिक टिप्स पाळल्या नाहीत, तर तुमचा मेकअप त्वचेवर चांगला ब्लेंड होत नाही. यामुळे तुमची त्वचा तुम्हाला खूप विचित्र वाटू लागते. चला, जाणून घ्या मेकअपच्या काही टिप्स-

ट्रेंडिंग न्यूज

गोऱ्या त्वचेवर फाउंडेशन

जर तुमचा रंग खूप गोरा असेल तर तुम्ही जड फाउंडेशन टाळावे. टिंटेड मॉइश्चरायझर आणि शीअर फाउंडेशन तुम्हाला नैसर्गिक लुक देईल. हे फाउंडेशन तुमच्या त्वचेवर चांगले मिसळेल.

लहान डोळ्यांसाठी मेकअप हॅक

जर तुमचे डोळे लहान असतील तर डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्यात ओढून वरच्या बाजूला आयलायनर किंवा काजल पेन्सिल लावा. खालच्या बाजूला मस्करा लावा आणि दोन ओळी एकत्र करा.

तेलकट त्वचेसाठी मेकअप हॅक

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पावडरवर आधारित ब्लश वापरा. ते त्वचेतील अतिरिक्त तेल शोषून घेते. याशिवाय ब्लशर वापरण्यापूर्वी थोडीशी टॅल्कम पावडर लावू शकता.

कन्सीलर आणि फाउंडेशन कसे सेट करावे?

डोळ्यांभोवती कन्सीलर आणि फाउंडेशन सेट करण्यासाठी, एक लहान ब्रश सैल पावडरमध्ये बुडवा आणि हल्की डस्ट करा. यामुळे तुमची त्वचा खूप सुंदर दिसेल.

स्मोकी मेकअप कधी करायचा?

संध्याकाळच्या पार्टीसाठी डोळ्यांना स्मोकी लुक द्या. यामुळे तुमच्या वेस्टर्न आउटफिट्ससोबत स्मोकी लूक परफेक्ट होईल. लक्षात ठेवा की आयशॅडो जास्त स्मज करू नकात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग