मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Home Remedies: थंडीमुळे शरीरात दिसतात हे बदल? आराम देतील हे घरगुती उपाय

Home Remedies: थंडीमुळे शरीरात दिसतात हे बदल? आराम देतील हे घरगुती उपाय

Hiral Shriram Gawande HT Marathi
Jan 03, 2024 02:02 PM IST

Winter Health Care Tips: अनेक लोकांना थंडीच्या दिवसात हुडहुडी भरते किंवा जास्त थंडी लागते. अशा वेळी अनेक समस्या सुद्धा उद्भवतात. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता.

थंडीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
थंडीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय (unsplash)

Home Remedies to Get Relief from Cold: जानेवारी महिन्यात थंडी जास्त वाढते. या ऋतूत तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके आरोग्यासाठी चांगले असते. कारण थोडासा हलगर्जीपणा तुम्हाला सर्दी होण्यास कारणीभूत ठरू शकतो. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला डोकेदुखी, नाक वाहणे, खोकला किंवा अंगदुखी आहे, तर ही अंगात थंडी भरल्याची लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास ताबडतोब सावध व्हा. यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. थंडीपासून संरक्षण करण्यासाठी तसेच थंडी भरल्यास आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे ते जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

काळी मिरी आणि गुळाचा काढा प्या

खोकला आणि छातीत जळजळ यापासून आराम मिळण्यासाठी गूळ उपयुक्त आहे. याशिवाय हे अँटी बॅक्टेरियल सुद्धा आहे, जे इंफेक्शन कमी करण्यास मदत करते. यासाठी काळी मिरी बारीक करून गरम पाण्यात उकळा. आता त्यात जिरे आणि गूळ घाला. तयार झालेला काढा गरम गरम प्या.

स्टीमने मिळेल त्वरित आराम

छातीत साचलेल्या श्लेष्मा किंवा कफपासून आराम मिळवण्याचा स्टीमचा फायदा होतो. यासाठी पाणी गरम करून एका मोठ्या भांड्यात ओता. यानंतर डोक्यावर टॉवेल किंवा कोणतेही जाड कापड ठेवा आणि ते डोक्यापासून खाली चेहरा पूर्ण झाकून घ्या. आता ही वाफ साधारण ५ ते १० मिनिटे घ्या. या पाण्यात तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकता. याने लवकर आराम मिळतो.

ज्येष्ठमधचा चहा आहे फायदेशीर

जेष्ठमध कफ वितळण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे छातीत उष्णता निर्माण होते आणि जळजळ आणि सूज यापासून आराम मिळतो. हे छातीतील कंजेशन दूर करण्यास मदत करते. त्याच्या मदतीने तुम्ही हर्बल चहा बनवू शकता.

कोल्ड वेवपासून कसे संरक्षण करावे

- कोल्ड वेव म्हणजेच थंडीची लाट टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपले कपडे लेअरमध्ये घालणे. डोके, हात आणि मान उबदार ठेवण्यासाठी टोपी, हातमोजे आणि स्कार्फ घाला.

 

- थंडीत घरातच रहा. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा गरज असेल तरच घराबाहेर पडा.

- यासोबतच शरीर उबदार ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. गरम अन्न घ्या आणि उबदार कपडे घाला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel