Foods to Reduce High Blood Pressure Risk: हिवाळ्याच्या दिवसात आरोग्याची तसेच शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. विशेषत: उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी आपल्या आहाराची आणि रुटीनची काळजी नीट घेणे आवश्यक असते. अन्यथा आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. अनेक वेळा थंडीत शरीरातील रक्त घट्ट होऊ लागते. त्यामुळे गाठी होण्याची भीती असते.
Heart.org नुसार कमी तापमान आणि थंडीमुळे रक्तवाहिन्या आकसायला लागतात. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या वाढते. कधी कधी रक्त घट्ट झाल्यामुळे गाठी होऊ लागतात. अशा परिस्थितीत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे.
शरीरात रक्त घट्ट होण्याची किंवा गाठी तयार होण्याची लक्षणे सहज दिसून येत नाहीत. जेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ लागतात. त्यानंतरच त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो आणि ही लक्षणे दिसू लागतात.
- अंधुक दृष्टी
- चक्कर येणे
- त्वचेवर निळे पुरळ दिसणे
- मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणे
- डोकेदुखी
- उच्च रक्तदाब
- त्वचेवर खाज येणे
- थकवा जाणवणे
- श्वास लागणे
- संधिवात
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हिवाळ्यात या पदार्थांचा आहारात समावेश जरूर करावा. मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने संपूर्ण शरीरात ब्लड सर्कुलेशन सुधारते.
डाळिंब एकूण आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. त्यात नायट्रेट्स, पॉलिफेनॉल अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्तवाहिन्या रुंद करण्यास आणि त्यांच्यातील रक्त प्रवाह सुलभ करण्यास मदत करते.
लसूण हे नॅचरल ब्लड थिनर आहे. त्यामुळे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी हिवाळ्यात रक्ताच्या गाठी होऊ नयेत म्हणून ते जरूर खावे. हे मज्जातंतूंचा ताण कमी करते आणि त्यांना आराम देते. त्यामुळे नसा आकसत नाहीत आणि उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो.
दालचिनी हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. हे रक्तवाहिन्यांना आराम देते आणि त्यांना रुंद करते. संशोधनात असेही समोर आले आहे की दालचिनी कोरोनरी आर्टरीमध्ये ब्लड फ्लो वाढवते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. संशोधनात असे दिसून आले आहे की हायपरटेंशनमुळे वाढलेल्या रक्तदाबासाठी दालचिनीचे सेवन आवश्यक आहे.
आले हे पचनास मदत करण्यासाठी वापरले जाते. पण हे शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढवण्यासही मदत करते. तुमच्या रोजच्या आहारात आल्याचा समावेश केल्यास हिवाळ्यात रक्त गोठण्याचा धोका कमी होतो.
फिनॉल रिच फूड्स मटार, बीन्स, सोया मिल्क, ग्रीन टी, ब्लॅक टी, पार्सले हे आहेत. तसेच ऑलिव्ह ऑइलमध्ये फिनॉलचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचा आहारात समावेश केल्यास रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो. त्यामुळे फिनॉल अँटीऑक्सिडंट्स असलेले पदार्थ खाणे आवश्यक आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)