उन्हाळ्यात स्किनची कितीही काळजी घेतली तरी अनेक वेळा पिंपल्सचा त्रास होतोच. तसं तर पिंपल्स कमी करण्यासाठी, त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी बरेच प्रोडक्ट उपलब्ध आहेत. पण लगेच आराम मिळावा यासाठी घरगुती फेस पॅक हे उत्तम ऑप्शन आहे. चला तर जाणून घेऊया पिंपल्स पासून मुक्ती मिळवण्यासाठी होममेड फेस पॅक कसे बनवावे.
मेथी फेस पॅकः मेथी मध्ये ॲन्टी बायोटिक आणि ॲन्टिसिप्टिक गुण असतात, जे पिंपल्सला हील करण्यात आणि स्किन इंफेक्शन पासून दूर ठेवण्यास मदत करतात. हा पॅक बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मेथी दाणे आणि पाणी लागेल. रात्रभर मेथी पाण्यात भिजवून घ्या. दुसऱ्या दिवशी सकाळी हे ब्लेंडर मध्ये बारीक करून पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. साधारण १२ ते १५ मिनीटांनंतर हलके सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातून एकदा लावावे.
हळद आणि कोरफळः हळदीमध्ये ॲन्टी बेक्टेरियल आणि ॲन्टी इंफ्लामेटरी प्रॉपर्टी असते, जे ॲक्न ट्रिटमेंटमध्ये मदत करते. तसेच कोरफळ मध्ये सूदींग प्रॉपर्टी असते. हा पॅक बनवण्यासाठी ताज्या कोरफळच्या पानातून जेल वेगळे काढून घ्या. त्यात एक चमचा हळद नीट मिक्स करा. पेस्ट बनवण्यासाठी गरज लागल्यास तुम्ही यात थोडे पाणी टाकू शकता. हे फेस पॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनीटांसाठी ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
बेसन, मध आणि दहीः हा फेस पॅक पिंपल्सपासून मुक्ती देण्यासोबतच डेड स्किन काढण्यास देखील मदत करते. हा पॅक बनवण्यासाठी एका वाटीत बेसन घ्या. त्यात एक चमचा हळद आणि दही मिक्स करा. नीट मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्या. नंतर हे चेहरा आणि मानेवर नीट लावा. १५ मिनीटांनंतर सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोनदा लावू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवाः
- दिवसातून दोन वेळा चेहरा धुवा.
- रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढून घ्या आणि चेहरा नीट स्वच्छ करा.
- बाहेर उन्हात जाणार असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका.
- दैनंदिन आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा.
- दिवसातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या.
- डायटमध्ये कमीत कमी साखर खा.
संबंधित बातम्या