मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thandai Recipe: या होळीला भांग नाही तर ट्राय करा पान थंडाई, मजा होईल डबल

Thandai Recipe: या होळीला भांग नाही तर ट्राय करा पान थंडाई, मजा होईल डबल

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 01, 2023 02:36 PM IST

Holi Special Recipe: होळीला भांग प्यायला अनेकांना आवडते. पण यंदा त्याऐवजी पान थंडाई ट्राय करा. ही रेसिपी तुमच्या होळीची मजा दुप्पट करेल.

पान थंडाई
पान थंडाई

Paan Thandai Recipe: होळी म्हटले की डोळ्यासमोर येते रंगीबेरंगी गुलाल, रंग, स्नॅक्स आणि भांगची थंडाई. पण यंदा होळीची मजा वाढवण्यासाठी भांग नाही तर ट्राय करा पान थंडाई. ही थंडाई बनवायला खूप सोपी तर आहेच पण आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही थंडाई प्यायल्याने भांगच्या थंडाईसारखी नशा होत नाही. त्यामुळे घरातील मोठ्यांसोबत लहान मुलेही याचा आनंद घेऊ शकतात. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया चविष्ट पान थंडाई कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

पान थंडाई बनवण्यासाठी साहित्य

- १ कप थंड दूध

- १/२ कप बदाम

- १/२ कप पिस्ता

- १/२ कप काजू

- ४-५ केशर

- ५-६ गुलाबाच्या पाकळ्या

- २ चमचे साखर

- २ विड्याची पाने

- १ टीस्पून टरबूज बिया

- १ टीस्पून खसखस

- १ टीस्पून बडीशेप

- २ वेलची

- १ थेंब हिरवा रंग

- गार्निशिंगसाठी गुलकंद

- २ ग्लास गरम पाणी

पान थंडाई बनवण्याची पद्धत

पान थंडाई बनवण्यासाठी प्रथम बदाम, पिस्ता, काजू, टरबूज बीया, खसखस, बडीशेप, वेलची, केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या २ तास गरम पाण्यात भिजवून ठेवा. ठराविक वेळानंतर या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये टाका आणि त्याची सॉफ्ट पेस्ट तयार करा. या पेस्टसोबत विड्याचे पाने, साखर, दूध मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. यात एक थेंब हिरवा फूड कलर टाकून मिक्स करुन घ्या. आता ज्या ग्लासमध्ये थंडाई सर्व्ह करायची आहे त्या ग्लासमध्ये २ बर्फाचे तुकडे टाका आणि थंडाई घाला. थंडाईला गुलकंदने सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.

WhatsApp channel

विभाग