मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Recipe: धुलिवंदनाला पदार्थांनाही द्या कलरफुल टच, बनवा बेसनाच्या रंगीबेरंगी मठरी

Holi Recipe: धुलिवंदनाला पदार्थांनाही द्या कलरफुल टच, बनवा बेसनाच्या रंगीबेरंगी मठरी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 28, 2023 02:26 PM IST

Recipe for Dhulivandan: धुलिवंदनच्या दिवशी गेट टुगेदरसा स्नॅक्स तयार करत असाल तर यंदा पदार्थांना सुद्धा रंगांचा ट्विस्ट द्या. बेसनापासून रंगीबेरंगी मठरी बनवून होळीचा उत्साह वाढवा.

बेसनाच्या रंगीबेरंगी मठरी
बेसनाच्या रंगीबेरंगी मठरी

Colourful Besan Mathri Recipe: रंगांचा आणि मौजमजेचा सण म्हणजे धुलिवंदन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रंगांचा हा सण खास बनवण्यासाठी घरातील महिलांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. होळीच्या पार्टीच्या दिवशी घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी नाश्त्यात विविध प्रकारचे पदार्थ दिले जातात. तुम्हालाही होळीच्या दिवशी तुमच्या मित्रांना रंगीबेरंगी स्नॅक्स सर्व्ह करायचा असेल तर कलरफुल बेसन मठरी ट्राय करा.

बेसनाच्या रंगीबेरंगी मठरी बनवण्यासाठी साहित्य

- बेसन - २०० ग्रॅम

- बेकिंग सोडा - १/२ चमचे

- तेल - १ कप

- खाण्याचा रंग - लाल, हिरवा आणि पिवळा

- मीठ - चवीनुसार

बेसनाची रंगीबेरंगी मठरी बनवण्याची पद्धत

बेसनाची रंगीबेरंगी मठरी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात बेसन, मीठ आणि खाण्याचा सोडा एकत्र करून नीट मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण कोमट पाण्याने कणके प्रमाणे मळून घ्या आणि दहा मिनिटे बाजूला ठेवा. १० मिनिटांनंतर पीठाचे तीन समान भाग करा आणि वेगळे ठेवा. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे फूड कलर घाला आणि चांगले मिक्स करा. यानंतर बेसनाचे पीठ मठरीच्या आकारात करून घ्या आणि कढईत तेल घालून ते ब्राऊन होईपर्यंत तळा. तुमची चविष्ट, रंगीबेरंगी बेसनाची मठरी तयार आहे.

WhatsApp channel

विभाग