मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  होळीला बनवा राज कचोरी, रेस्टॉरंटसारख्या टेस्टसाठी फॉलो करा ही रेसिपी

होळीला बनवा राज कचोरी, रेस्टॉरंटसारख्या टेस्टसाठी फॉलो करा ही रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 27, 2023 06:43 PM IST

Snacks Recipe: धुलिवंदनच्या दिवशी पार्टीसाठी काही वेगळे स्नॅक्स ट्राय करायचे असेल तर बनवा राज कचोरी. रेस्टॉरंट सारखे बनवण्यासाठी पहा ही रेसिपी.

राज कचोरी
राज कचोरी (freepik)

Raj Kachori Recipe: पार्टी म्हटलं की दहीवडे मेनूमध्ये असतातच. थंड दही केवळ तोंडाची चव सुधारण्याचे काम करत नाही तर तुमचा मूड देखील सुधारते. यावर्षी होळीच्या पार्टीमध्ये काही वेगळं ट्राय करायचं विचार करत असाल तर राज कचोरीची ही चविष्ट रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी रेस्टॉरंट सारख्या राज कचोरीचा अनुभव तर देईलच पण तुमच्या होळी पार्टीची मजाही द्विगुणित करेल. चला तर मग वाट कसली पाहताय जाणून घेऊया रेस्टॉरंटसारखी राज कचोरी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

राज कचोरी बनवण्यासाठी साहित्य

- १ राज कचोरी बास्केट

- २ चमचे गोड दही

- १ टीस्पून चिंचेची चटणी

- १ टीस्पून कोथिंबीर चटणी

फिलिंग बनवण्यासाठी

- १०० ग्रॅम उकडलेले बटाटे

- ४ पापड्या

- ५० ग्रॅम उकडलेले चणे

- काही डाळिंबाचे दाणे

- १०० ग्रॅम स्प्राउट

- १ दही वडा

- शेव

सीझनिंगसाठी

- एक चिमूटभर पिवळी मिरची

- काळी मिरी

- मीठ

राज कचोरी बनवण्याची पद्धत

राज कचोरी बनवण्यासाठी प्रथम पापडी, दही वडा, उकडलेले चणे, स्प्राउट, डाळिंब, शेव आणि आले राज कचोरी बास्केटमध्ये टाकून त्यावर मसाला शिंपडा. त्यानंतर आता त्यावर चिंचेची चटणी, कोथिंबीर चटणी आणि दही घाला. तुमची चविष्ट राज कचोरी तयार आहे. डाळिंबाच्या दाण्यांनी सजवून सर्व्ह करा.

WhatsApp channel