मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  होळीला स्नॅक्सचा मजा डबल करेल चिंचेची आंबड गोड चटणी, पाहा या २ इंस्टंट रेसिपी

होळीला स्नॅक्सचा मजा डबल करेल चिंचेची आंबड गोड चटणी, पाहा या २ इंस्टंट रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 26, 2023 04:37 PM IST

Holi Snacks: होळीला वेगवेगळ्या स्नॅक्सची चव वाढवण्यासाठी चिंचेची आंबट गोड चटणी बनवण्याचा विचार करत आहात. तर या दोन पद्धतीने तुम्ही झटपट ती बनवू शकता. ट्राय करा या रेसिपी.

चिंचेची आंबड गोड चटणी
चिंचेची आंबड गोड चटणी (freepik)

Instant Recipe of Tamarind Chutney: होळीची पार्टी म्हटली की स्नॅक्सची लांबलचक लिस्ट तयार होते. या चटपटीत स्नॅक्सची मजा दुप्पट होते जेव्हा त्यासोबत चटपटीत चटणी असते. विशेषतः आंबट-गोड चिंचेच्या चटणीशिवाय स्नॅक्सची चव अपूर्ण वाटते. लहान मुले असोत किंवा मोठे, प्रत्येकालाच दही वडेपासून कचोरीपर्यंत सोबत चिंचेच्या चटणीची चव आवडते. चिंचेची चटणी वेगळ्या पद्धतीने बनवायची असेल तर यावेळी या दोन रेसिपी ट्राय करून बघा. खजूर आणि चिंचेची चटणी लहान मुले आणि मोठ्यांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊया खजूर आणि चिंचेची चटणी कशी बनवायची

ट्रेंडिंग न्यूज

चिंचेची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- एक वाटी चिंचेचा कोळ

- अर्धी वाटी खजूर

- अर्धी वाटी गूळ

- अर्धा चमचा लाल तिखट

- अर्धा चमचा धने पावडर

- थोडा गरम मसाला

- गरम पाणी

- मीठ

- एक हिरवी मिरची

- एक छोटा चमचा जिरे

- अर्धा चमचा आले लसूण पेस्ट

- तिळ

- तेल

चिंचेची चटणी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम खजुराच्या बिया काढून गरम पाण्यात भिजवावे. गुळाचे छोटे तुकडे करा. आता चिंचेचा गर आणि खजूर गॅसवर दहा मिनिटे पाण्यात शिजवून घ्या. दोन्ही शिजल्यावर गॅस बंद करून थंड होऊ द्या. मिक्सर जारमध्ये खजूर आणि चिंच घालून प्युरी बनवा. काचेच्या भांड्यात चाळणीच्या साहाय्याने ते फिल्टर करा. कढई गरम करून त्यात तेल घालावे. तेल गरम झाल्यावर जिरे टाका. त्यात आलं-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घाला. नंतर त्यात चिंच आणि खजूर गाळलेली पेस्ट घालून मिक्स करा. सोबतच गूळ घाला. थोडे पाणी घालून चमच्याने गूळ विरघळे पर्यंत ढवळत रहा. गूळ विरघळला की आठ ते दहा मिनिटे शिजवून घट्ट करावा. फक्त खजूर आणि चिंचेची आंबट-गोड चटणी तयार आहे.

चिंचेची साधी चटणी

चिंचेची साधी चटणी बनवण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. फक्त चिंचेचा गर गाळून त्यात गूळ घाला. गूळ विरघळला की कढई गरम करून त्यात हे मिश्रण घालावे. मंद आचेवर शिजवताना बडीशेप घाला. त्यात थोडी साखर, लाल तिखट आणि चिमूटभर काळे मीठ घालून शिजवावे. चटणी घट्ट होताच गॅस बंद करा. टेस्टी चिंचेची चटणी तयार आहे.

WhatsApp channel

विभाग