मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Special Recipe: डाळ दळण्याची कटकट विसरा, होळीला झटपट बनवा रव्याचे दही वडे

Holi Special Recipe: डाळ दळण्याची कटकट विसरा, होळीला झटपट बनवा रव्याचे दही वडे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 24, 2023 05:46 PM IST

Instant Dahi Vada Recipe: यावेळी होळीच्या पार्टीसाठी दही वडे बनवण्याचा विचार करत असाल तर डाळी भिजवण्याचा आणि दळण्याचा त्रास सोडा. रवा दही वडे काही मिनिटांत तयार करा. पहा ही झटपट होणारी रेपिसी.

रव्याचे दही वडे
रव्याचे दही वडे

Instant Rava Dahi Vada Recipe: होळीच्या सणाला एकत्र येऊन रंग खेळून उत्साह वाढवला जातो. अशा वेळी पार्टीसाठी वेगवेगळे डिशेस बनवले जातात. पार्टीसाठी तुम्ही चटपटीत दहीवडे बनवू शकता. दही वडा बनवण्यासाठी डाळी भिजवले, त्या वाटणे हे खूप वेळखाऊ काम आहे. यासोबतच हे काम खूप कटकटीचे वाटू शकता. या सगळ्या त्रासातून सुटका हवी असेल, तर ही रेसिपी लक्षात ठेवा. यावेळी होळी पार्टीसाठी रव्याचे दही वडे बनवा. कोणत्याही पूर्वतयारी शिवाय हे झटपट आणि वेळेत तयार केले जातात. चला तर मग जाणून घेऊया रव्याचे दही वडे बनवण्याची रेसिपी.

ट्रेंडिंग न्यूज

रवा दही वडा बनवण्यासाठी साहित्य

- २०० ग्रॅम रवा

- १ कप दही आणि सर्व्ह करण्यासाठी आवश्यकतेनुसार

- चवीनुसार मीठ

- १ इंच आल्याचा तुकडा

- २-३ हिरव्या मिरच्या

- बेकिंग सोडा १/४ चमचा

- तेल वडे तळण्यासाठी

रवा दही वडे बनवण्याची पद्धत

एका भांड्यात रवा घेऊन त्यात एक कप दही मिक्स करा. या मिश्रणात मीठ घाला आणि सोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले आणि कोथिंबीर घाला. दही आणि रव्याचे हे मिश्रण अर्धा तास तसेच ठेवा. जेणेकरून रवा फुगतो. साधारण अर्ध्या तासानंतर या मिश्रणात एक चतुर्थांश चमचा बेकिंग सोडा घाला. चांगले फेटून घ्या. वड्याचे मिश्रण तयार आहे.

वडे बनवण्यासाठी एखाद्या बाउलला कापड बांधा. आता त्यात वाटी उलटी करुन त्यावर वड्याचे मिश्रण टाकून बोटाच्या सहाय्याने मधोमध छिद्र करा. हातांच्या मदतीने त्याला गोलाकार आकार द्या. आता कढईत तेल गरम करा आणि वाटी पलटवून हे वडे तेलात टाका. मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. याप्रमाणे सर्व वडे तळून घ्या. आता हे वडे मीठ मिसळलेल्या पाण्यात टाका. जेणेकरून सर्व वडे फुगतील. काही वेळाने पाण्यातून बाहेर काढा. आता एका बाऊलमध्ये दही घेऊन चांगले फेटून घ्या. त्यात साखर, मीठ, भाजलेले जिरं टाकून मिक्स करुन घ्या. आता यात वडे टाकून सर्व्ह करा. तुम्ही हे दही वड्याच्या वर टाकून, त्यावर तिखट, जिरे पावडर, कोथिंबीर, शेवने गार्निश करुन सुद्धा सर्व्ह करु शकता.

WhatsApp channel

विभाग