मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Thandai Recipe: होळीला पाहुण्यांना सर्व्ह करा पान थंडाई शॉट्स, सोपी आहे रेसिपी

Thandai Recipe: होळीला पाहुण्यांना सर्व्ह करा पान थंडाई शॉट्स, सोपी आहे रेसिपी

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 04, 2023 05:43 PM IST

Holi Special Recipe: होळीच्या दिवशी थंडाई आणखी खास बनवण्यासाठी तुम्ही पान फ्लेअवर ट्राय करु शकता. पहा ही सोपी रेसिपी.

थंडाई
थंडाई (freepik)

Paan Thandai Shots Recipe: होळी आणि थंडाईचे कॉम्बिनेशन काही नवीन नाही. होळी म्हटली की थंडाईचा विषय येणार नाही, असे कसे होईल. या उत्सवात विविध पदार्थ तयार केले जातात. पण ड्रिंकमध्ये थंडाई नक्कीच असते. होळीच्या दिवशी लोक हे ड्रिंक मोठ्या उत्साहाने पितात. केशर, काजू, बदाम, पिस्त्यापासून बनवलेले हे ड्रिंक चवीला अप्रतिम दिसते. मात्र यावेळी तुम्ही काही प्रयोग करून घरी आलेल्या पाहुण्यांना पान थंडाई देऊ शकता. येथे पहा पान थंडाई शॉट्सची रेसिपी-

पान थंडाई शॉट्स बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे-

- विड्याची पाने

- दूध

- बडीशेप

- गुलकंद

- थंडाई पावडर

कसे बनवावे

हे बनवण्यासाठी विड्याची पाने ब्लेंडरमध्ये टाका. त्यात गुलकंद, बडीशेप आणि साखर घाला. ते एकदा चांगले ब्लेंड करा आणि नंतर थंडाई पावडर घाला. हे ब्लेंड करा आणि थंड दूध घाला. हे सर्व काही चांगले एकत्र मिक्स होईपर्यंत चांगले ब्लेंड करा. मिश्रण गुळगुळीत करण्यासाठी चाळणीने गाळून घ्या. ड्रिंक एका लहान शॉट ग्लासमध्ये घाला. नंतर वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या किंवा बडीशेपने सजवा. तुमची पान थंडाई शॉट्स रेडी आहे. थंडगार सर्व्ह करा.

या गोष्टींची काळजी घ्या

- जर तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता.

- सर्व्ह करण्यापूर्वी एक तास आधी थंडाई तयार करा आणि नंतर थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.

WhatsApp channel

विभाग