मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Fashion Tips: होळीसाठी व्हायचंय रेडी? या अभिनेत्रींच्या लूकवरुन घ्या टिप्स

Holi Fashion Tips: होळीसाठी व्हायचंय रेडी? या अभिनेत्रींच्या लूकवरुन घ्या टिप्स

Hiral Shriram Gawande HT Marathi
Feb 24, 2023 08:49 PM IST

Holi Looks Idea: होळीला रंग खेळताना आणि होळीची मजा घेताना स्टाईलशी तडजोड करू नका. जान्हवी कपूरपासून ते सारा अली खानच्या स्टायलिश आणि कंम्फर्टेबल लूकपर्यंत तुम्हीही तयार होण्यासाठी टिप्स घेऊ शकता.

होळीसाठी आउटफिट आयडिया
होळीसाठी आउटफिट आयडिया

Outfit Ideas for Holi: होळीचा सण जवळ आला आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही पूर्ण मस्तीच्या मूडमध्ये असाल. सणासुदीला पार्टी करणे, मित्रपरिवाराला भेटणे सर्वांनाच आवडते. एकीकडे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट करत केले जातात. अशा वेळी प्रत्येक जण मौजमजा करण्यासोबतच आपल्या लूकचीही काळजी घेतो. शेवटच्या क्षणी कपडे ठरवण्याची चूक करायची नसेल तर या होळीला या सेलिब्रिटी लूकवरुन टिप्स घ्या आणि आधीच चांगली तयारी करा.

ट्रेंडिंग न्यूज

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरसारखा साधा पांढरा स्लीव्हलेस कुर्ता ट्राय करा. मेटॅलिक कानातले आणि बांगड्यांसह लुक ऍक्सेसराइझ करा. दुसरीकडे, कपाळावर टिकली असलेला हा होळीचा लुक एकदम परफेक्ट दिसेल.

शॉर्ट्स आणि टाय अँड डाय टी-शर्ट

जर तुम्हाला होळीला कूल लुक हवा असेल तर टाय अँड डाय प्रिंट टी-शर्टसोबत डेनिम शॉर्ट्स कॅरी करा. त्यासोबत फ्लॅट फूटवेअर सुंदर दिसतील.

सोबत शर्ट घाला

जर तुम्हाला टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्समध्ये थोडा अधिक प्रयोग करायचा असेल तर ओव्हरसाइज शर्ट कॅरी करा. हा लूकला फेस्टिव्ह रेडी करण्यासाठी ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी निवडा. ज्यामध्ये चंकी नेकपीस आणि ब्रेसलेट कॅरी करा. हा लूक स्टायलिश दिसेल.

सारा अली खान

सारा अली खानसारखा साधा पांढरा कुर्ता ट्राय करु शकता. वेव्ह प्रिंटच्या या दुपट्ट्यासोबत हा लूक कलरफुल होईल. त्याच वेळी बॉटम म्हणून पँट किंला चुडीदार घाला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग