मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Heatwave: राज्यात उष्णतेची लाट; हिटवेव्ह पासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी!

Heatwave: राज्यात उष्णतेची लाट; हिटवेव्ह पासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
May 12, 2023 01:15 PM IST

Heatwave Precautions: महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसापासून प्रचंड उन्ह वाढलं आहे. गरमीचा पारा वाढला आहे. अशावेळी हिटवेव्ह पासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची गरजेचे आहे.

Heatwave alert in Maharashtra
Heatwave alert in Maharashtra (Pixabay )

Heatwave Alert: मे महिना सुरु होताच गरमीचा पारा फारच वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून तर राज्यातील अनेक शहरातील पारा शिगेला पोहोचला आहे. काही शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. कमाल तापमानात वाढ आणि आर्द्रतायुक्त हवा यामुळे १४ मेपर्यंत मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणात उष्णतेमुळे अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट आली तर त्याचा परिणाम शरीरावर होतो. यामुळेच स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. आजारी पडण्यापासून टाळण्यासाठी (Ways to avoid heat waves) काय लक्षात ठेवावे हे जाणून घेऊया.

Heatwave in Mumbai: मुंबईमध्ये आणखी दोन दिवस निघणार घामाच्या धारा… उष्णतेच्या लाटेत काळजी घ्या

या गोष्टी लक्षात ठेवा

> उन्हाळ्यात कुठेतरी बाहेर जात असाल तर नक्कीच पाणी सोबत ठेवा. तुम्ही तुमच्यासोबत लिंबूपाणी किंवा ORS सारखी पेये देखील घेऊन जाऊ शकता.

> हिट वेव्ह टाळण्यासाठी, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये जास्त साखरयुक्त पेये टाळा. तसेच हाय प्रोटीन फूड आणि शिळे पदार्थ खाणे टाळा.

> दुपारी उन्हात बाहेर पडणे टाळा.विशेषत: दुपारी १२ ते ३:०० या वेळेत घराबाहेर पडू नका. खूप महत्त्वाचे काम असेल तर डोके झाकून आणि टोपी घालूनच घराबाहेर पडा.

> उन्हाळ्यात, हलक्या रंगाचे सुती कपडे घाला, जेणेकरून उष्णता आणि सूर्यप्रकाशाचा प्रभाव कमी होईल.

> उष्णतेची लाट टाळण्यासाठी, मसालेदार अन्नापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि उन्हाळ्यात अधिकाधिक वनस्पतींवर आधारित आहार घ्या. तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांच्या रसांचा समावेश करा.

> त्याचप्रमाणे उन्हाळ्यात हायड्रेशनची समस्या उद्भवते, अशा परिस्थितीत तुम्ही दररोज पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न करा, शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे तुम्ही आजारी पडू शकता. उष्माघात घरी बसूनही होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel

विभाग