मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत या नॅचरल गोष्टी, लवकर दिसेल फरक

Health Tips: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत या नॅचरल गोष्टी, लवकर दिसेल फरक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 08, 2023 02:10 PM IST

Tips to Reduce Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल हा असा खराब पदार्थ आहे, जो नसांमध्ये जमा होतो आणि ज्यामुळे रक्ताभिसरण थांबू शकते. त्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हे काही नैसर्गिक मार्ग जाणून घ्या.

बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टिप्स
बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी टिप्स (unsplash)

Natural Ways to Reduce Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढणे ही झपाट्याने पसरत असलेली समस्या आहे, जी अनेकांना चिंतित करते. हाय कोलेस्ट्रॉलमुळे तुम्हाला हार्ट अटॅक आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. औषधे तुमचे कोलेस्ट्रॉल सुधारण्यास मदत करू शकतात. पण जर तुम्हाला तुमचे कोलेस्ट्रॉल सुधारण्यासाठी आधी जीवनशैलीत बदल करायचा असेल तर तुम्ही या नैसर्गिक पद्धती वापरून पाहू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

वजन मेंटेन करा

लठ्ठपणामुळे मधुमेह, थायरॉईड तसेच हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. वजन मेन्टेन केले तर अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो. वजन मेंटेन ठेवण्यासाठी हेल्दी अन्न खा आणि व्यायाम करा.

दारूपासून दूर राहा

अल्कोहोल तुमच्या हृदयाला हानी पोहोचवू शकते. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. ज्यामुळे स्ट्रोक आणि हार्ट फेलियरचा धोका वाढतो. निरोगी राहण्यासाठी अल्कोहोल टाळणे चांगले आहे.

व्यायाम महत्वाचे आहे

व्यायामाअभावी कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची तक्रार असते. अहवालांवर विश्वास ठेवला तर, दररोज व्यायाम केल्याने तुम्हाला बरेच आरोग्य फायदे मिळतात. यासोबतच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

धूम्रपान सोडणे

एचडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यासाठी धूम्रपान टाळले पाहिजे. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ही सवय सोडा आणि असे केल्याने तुम्हाला त्वरित फायदे मिळतील. कारण यामुळे रक्ताभिसरण आणि फुफ्फुसाचे कार्य सुधारते.

हेल्दी आहार घ्या

विरघळणारे फायबर तुमच्या रक्तप्रवाहात कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करू शकते. ओट्स, किडनी बीन्स, ब्रसेल्स स्प्राउट्स, सफरचंद आणि नाशपती यांसारख्या पदार्थांमध्ये विरघळणारे फायबर आढळते. त्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग