मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: वेट लॉस आणि डायबिटीजसाठी रामबाण आहे इसबगोल, मिळतात अनेक फायदे

Health Tips: वेट लॉस आणि डायबिटीजसाठी रामबाण आहे इसबगोल, मिळतात अनेक फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 05, 2023 05:32 PM IST

धावपळीच्या जीवनशैलीत लोक हेल्दी खाण्यापासून आणि डाटयपासून कोसो दूर आहेत. पण या सर्व समस्या असूनही काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. येथे जाणून घ्या इसबगोलचे फायदे.

इसबगोलचे फायदे
इसबगोलचे फायदे (freepik)

Health Benefits of Isabgol: अनेकांना असे वाटते की इसबगोलची पावडर केवळ बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. तर असे नाही. बद्धकोष्ठतेशिवाय अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी ते फायदेशीर आहे. यामध्ये भरपूर फायबर असते, तसेच फॅट आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अजिबात नसते. इसबगोल सर्व वयोगटातील लोक खाऊ शकतात. वजन कमी करणे असो वा डायबिटीज, इसबगोलचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

इसबगोलचे फायदे

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

इसबगोल बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी वापरले जाऊ शकते. इसबगोलमध्ये असलेल्या अघुलनशील फायबरमुळे मल मऊ आणि विस्तारित होतो, ज्यामुळे आतड्याची हालचाल सुधारते. एक ग्लास कोमट दुधात दोन चमचे इसबगोल मिक्स करा आणि काही आठवडे रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी होईल

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इसबगोलमधील हायग्रोस्कोपिक गुणधर्म रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. हे आतड्यांमध्ये एक पातळ थर तयार करते जे अन्नातून कोलेस्ट्रॉलचे शोषण रोखते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

वजन कमी होईल

इसबगोल तुम्हाला दीर्घकाळ पोट भरलेले वाटण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला जंक फूड खाण्यापासून प्रतिबंध होतो. इसबगोल पावडर पाणी आणि लिंबाच्या रसात मिक्स करुन सकाळी रिकाम्या पोटी घेतल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

डायरियापासून मुक्ती मिळेल

हे दह्यात मिसळून खाल्ल्याने अतिसाराच्या लक्षणांपासून आराम मिळतो. त्यात असलेले तंतूमल घट्ट होण्यास मदत करतात जे अतिसाराचा त्रास होत असताना चांगले काम करतात.

अॅसिडिटी ठीक होईल

काही वेळा काही हानिकारक गोष्टी खाल्ल्यानंतर पोटात अॅसिडीटी होणे ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्ही या समस्येने त्रस्त असाल तर इसबगोलची भुसी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

मधुमेहापासून मुक्ती मिळते

इसबगोल मधुमेहासाठी उत्तम आहे. कारण त्यात जिलेटिन असते, जे शरीरातील ग्लुकोजचे विघटन आणि शोषण कमी करते. आहारात फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने इन्सुलिन आणि रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग