Mouth Ulcers: उष्णतेमुळे तोंडात सतत अल्सर येत आहेत का? या घरगुती उपायांनी मिळेल आराम!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mouth Ulcers: उष्णतेमुळे तोंडात सतत अल्सर येत आहेत का? या घरगुती उपायांनी मिळेल आराम!

Mouth Ulcers: उष्णतेमुळे तोंडात सतत अल्सर येत आहेत का? या घरगुती उपायांनी मिळेल आराम!

Apr 17, 2024 01:13 PM IST

Mouth Ulcers Home Remedies: जेव्हा तोंडात अल्सर येते तेव्हा फक्त खाणे-पिणे त्रासदायक होत नाही तर वेदना आणि जळजळ होण्याची समस्या देखील होते. तुम्हालाही हा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करा.

mouth ulcers due to the heat
mouth ulcers due to the heat (istock)

Mouth Ulcers In Summers: उन्हाळ्यात अनेक समस्या होतात. यातली एक कॉमन म्हणजे अल्सर येणे किंवा तोंड येणे. सध्या तर संपूर्ण देशात उष्णतेची लाट आली आहे. हवामानातील उष्णतेमुळे आपले शरीरही गरम होऊ लागते, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे अनेकांना अल्सरची समस्या होते. अनेकांना तोंडात फोड पण येतात. हे असे पोटात वाढलेल्या उष्णतेमुळे होते.जेव्हा तोंडात व्रण दिसतात तेव्हा तुम्ही काहीही खाऊ शकत नाही किंवा काही पिण्यासही सक्षम नाही. अशा परिस्थितीत तोंडात काहीही घातल्याबरोबर जळजळ आणि तीव्र वेदना होतात. हे फोड सहसा जीभ, हिरड्या, ओठ, तोंडाच्या आत किंवा घशात येतात.जर त्यांच्यावर वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर ते मोठे होतात, जे अधिक वेदनादायक असते. याचसाठी आम्ही काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. चला अल्सरवर घरगुती उपाय कोणते करता येतील याबद्दल जाणून घेऊयात.

हळू हळू लवंग चावा

अल्सरच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही लवंग चावू शकता. लवंगामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि वेदनाशामक गुणधर्म फोडाचे जंतूपासून संरक्षण करतात, ते लवकर बरे होण्यास मदत करतात आणि वेदनापासून आराम देतात.

Summer Care Tips: या ५ मसाल्यांचे उन्हाळ्यात माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे!

मीठाने तोंड धुवा

अल्सर लवकर निर्जंतुक करण्यासाठी आणि बरे करण्यासाठी, मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवा. मिठात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म सूक्ष्म जीव नष्ट करतात. हे करण्यासाठी, एक कप कोमट पाण्यात एक चमचा मीठ मिसळा. आता दिवसातून दोनदा काही मिनिटे याने चूळ भरा आणि अल्सर नीट धुवा.

Summer Pregnancy Tips: गरोदर मातांनी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या टिप्स!

दही खा

दही हे प्रोबायोटिक आहे. याचे सेवन केल्याने तुमच्या आतड्याची हालचाल आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. हे शरीराच्या नैसर्गिक संरक्षणास बळकट करते, ज्यामुळे तोंडाचे अल्सर बरे होतात.

Hydrating Fruits: उष्णतेवर मात करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी उन्हाळ्यात आवर्जून खा ही फळे!

पेरूचे पान

पेरूचे पान तोंडाच्या फोडांवरही उत्तम उपचार मानले जाते. पेरूचे कोवळे कोवळे पान घ्या, त्यात थोडे कातेचू घाला आणि तोंडात टाका आणि थोडावेळ चावा. यातून निघणारा रस तुमच्या तोंडाचा व्रण बरा करतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

Whats_app_banner