Relationship Tips: रागीट पार्टनरसोबत डील करण्यासाठी उपयुक्त आहेत या ट्रिक्स, एकदा ट्राय करा
Relation Tricks: एखाद्या गोष्टीवर राग येणे ही सामान्य बाब आहे. पण तुमचा पार्टनर अगदी छोट्याशा गोष्टीवर सुद्धा रागवत असेल तर मात्र सोबत राहणे थोडे अवघड असते. पार्टनर रागीट असेल तर या ट्रिक्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील.
Tricks to Deal With Angry Partner: कपल म्हटले की त्यांच्यात थोडेवार वाद, मतभेद हे आलेच. एखाद्या गोष्टी राग येणे, वाईट वाटणे हे खूप सामान्य आहे. परंतु प्रत्येक गोष्टीचा राग येऊ लागला तर त्या व्यक्तीसोबत राहणे फार कठीण होऊन बसते. विशेषत: अशी रागीट व्यक्ती तुमची पार्टनर असते, तेव्हा समस्या आणखी वाढतात. अशा परिस्थितीत रागीट पार्टनरसोबत डील करण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्सची गरज पडू शकते, ज्यामुळे तुम्हाला रोजच्या त्रासांपासून मुक्तता मिळू शकते.
ट्रेंडिंग न्यूज
रिअॅक्ट करू नका
जेव्हा जेव्हा पार्टनर रागवतो, त्यावेळी त्याच्याशी हुज्जत घालू नका. जर तुम्ही त्यावेळी रिअॅक्ट झालात तर प्रकरण संपण्याऐवजी आणखी वाढेल. त्यामुळे योग्य वेळ येण्याची वाट पहा. तुम्ही रिअॅक्ट केल्याने रागात असलेल्या पार्टनरला आणखी संधी मिळेल.
प्रेमाने उत्तर द्या
प्रेमाने राग शांत होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा पार्टनर रागाच्या भरात काही विचारत असेल तर त्याच्या बोलण्याला प्रेमाने उत्तर द्या. अशा परिस्थितीत जोडीदाराचा राग शांत होऊ शकतो.
पार्टनरला प्रेमाने समजवा
कुठलीही गोष्ट करण्याची एक वेळ असते. तुम्हाला देखील फक्त वेळेची वाट पहावी लागेल आणि जोडीदाराचा मूड पाहून बोलणे आवश्यक आहे. सर्वप्रथम त्यांना समजावून सांगा की राग येण्याने त्यांच्या आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होतो. अशा स्थितीत त्यांनाही वाटेल की तुम्हाला तुमच्या जोडीदाराची काळजी आहे.
अँगर मॅनेजमेंट थेरपी
येथे हे देखील समजून घेण्यासारखे आहे की तुमचा जोडीदार बालपणात काही आघातातून गेला असेल. त्यामुळे त्याचा स्वभाव असा झाला आहे. तुमचा जोडीदार स्वतः या समस्येशी झगडत असेल, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना थेरपीसाठी घेऊन जाऊ शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग