Relationship Tips: प्रेमाचे नाते हे समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणावर टिकून असते. पण कधी कधी कपल्स घाईमध्ये भावनेच्या आहारी जाऊन आपल्या नात्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेतात, जे पुढे जाऊन ब्रेकअपच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतात. जर तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनरशी नाराज आहात आणि ब्रेकअप करण्याचा विचार करत आहात, तर थांबा आणि विचार करा की काय खरंच तुमच्याकडे ब्रेकअप करण्याचा काही ठोस कारण आहे की तुमच्या नात्यात काहीतरी अडचण आली आणि तुम्ही धीर धरण्याऐवजी हा मार्ग निवडला. चला तर जाणून घ्या प्रत्येक कपलने ब्रेकअप करण्यापूर्वी स्वतःला कोणते ५ प्रश्न विचारले पाहिजे.
ब्रेकअप करण्यापूर्वी, पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे की तुमच्या नात्यात आदराची कमतरता आहे का? ब्रेकअप होण्यामागचं हे खूप महत्त्वाचं कारण आहे, एकमेकांचा आदर न करणे. पण जर तुमचा जोडीदार तुमच्या नात्यात तुमचा आदर करत असेल तर असे नाते संपवण्याआधी एकदा विचार करायला हवा.
काय तुमचा पार्टनर तुम्हाला वेळ देत नाही? नाते कोणतेही असो, त्यात ताजेपणा टिकवण्यासाठी दोघांनी एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे. जर तुमचा पार्टनर तुम्हाला पुरेसा वेळ देत असेल तर तो नक्कीच तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही लकी आहात, कारण वेळेपेक्षा काहीही मौल्यवान नाही. अशा प्रेमळ साथीला चुकूनही जाऊ देऊ नका.
आजच्या युगात लोकांना एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जाण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अनेक वेळा एका नात्यात राहूनही लोक दुसऱ्या नात्यात बंध जोडू लागतात. एका ठिकाणी प्रेमात असतानाही ते बाहेर प्रेम शोधू लागतात. अशा परिस्थितीत ब्रेकअप करण्यापूर्वी तुमच्या मनाला विचारा की तुमच्या जोडीदाराने दुसऱ्या व्यक्तीसाठी तुमची फसवणूक केली आहे का, दुसऱ्या व्यक्तीसाठी तुमच्याशी खोटे बोलले का. जर उत्तर नाही असेल, तर तुमच्या प्रामाणिक जोडीदाराला सोडण्यापूर्वी दोनदा विचार करा.
काय खरचं तुमच्याकडे ब्रेकअप करण्याचा काही ठोस कारण आहे की नाही. शांत डोक्याने विचार करा, तुमच्या नात्यात काही खट्टू किंवा तणाव होता, ज्यामुळे तुम्ही संयम न बाळगता हा मार्ग निवडला? तुमच्या जोडीदारापासून नात्यातील अंतर वाढवण्याची ही खरोखरच सुरुवात होती की तुम्ही स्वतःला मर्यादित करून दोष जोडीदारावर टाकला होता.
तुमचा पार्टनर तुमच्यावर प्रेम करत नाही का हे तुमच्या मनाला विचारणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर तुम्ही घाईत काही चुकीचे पाऊल उचलणार आहात. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच मिळतील.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)