Things to Do Before Marriage: लग्न ही गोष्ट मुलगा आणि मुलगी यांच्या दोघांच्याही आयुष्यातला सर्वात मोठे वळण असते. लग्नानंतर दोघांच्या आयुष्यात मोठे बदल होतात. पण कधी कधी हे बदल स्विकारणे कठीण होते. अनेकांना हे बदल स्विकारायला इतका वेळ लागतो की, ते अस्वस्थ व्हायला लागतात. हे बदल एकमेकांना समजून, सकारात्मक पद्धतीने स्विकारले तर पुढे काहीच अडचणी येत नाही. परंतु असे झाले नाही तर जीवनात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात. या सर्व गोष्टींसाठी मुलगा आणि मुलगी प्रत्येक प्रकारे तयार असले पाहिजे. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. हेल्दी रिलेशनसाठी लग्नापूर्वी या गोष्टी करायला विसरू नका.
अनेकदा जोडीदाराच्या मनात अनेक प्रश्न असतात. ते कोणत्याही गोष्टीशी संबंधीत असू शकतात. हे प्रश्न विचारले नाहीत, तर तुमच्या मनात अस्वस्थता येऊ शकते. मनातील प्रश्न हा अगदी नोकरीची संबंधित किंवा ड्रेसिंग सेन्स असा कोणताही असू शकतो. परंतु त्या प्रश्नांवर जोडीदाराशी चर्चा करणे महत्वाचे आहे.
लग्नाआधी भावी जोडीदाराशी गप्पा मारा. भावी आयुष्याच्या जोडीदाराशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत तुमच्या भावी जोडीदारासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करा. तसेच तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाची माहिती करून घ्या. आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही याबद्दल देखील बोला. लग्नाआधी असे केल्यास नाते मजबूत राहते. आणि एकमेकांना अधिक जाणून घेण्यात मदत होते.
तुमच्या जोडीदाराशी बोलल्यानंतर तुम्हाला तुमचा पार्टनर तुमची जबाबदारी घेण्यास तयार आहे की नाही याची माहिती करून घ्या. कौटुंबिक, सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याबाबत तो मानसिक रित्या तयार आहे की नाही या सगळ्याची माहिती आधीच करून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)