मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  मुलांच्या शारीरिकसह मानसिक विकासासाठी झुंबा फायद्याचे

मुलांच्या शारीरिकसह मानसिक विकासासाठी झुंबा फायद्याचे

Hiral Gawande HT Marathi
Apr 14, 2022 06:10 PM IST

झुंबा हे डान्स आणि अॅरोबिक्सचे कॉम्बिनेशन आहे. मोठ्यांसोबतच हे लहान मुलांसाठी देखील फायदेशीर असते. झुंबामुळे लहान मुलांना शारिरीक आणि मानसिक विकासासाठी फायदा होतो. जाणून घ्या संबंधी या गोष्टी.

मुलांसाठी झुंबा
मुलांसाठी झुंबा

झुंबा हे फीटनेससाठी चांगले आहे की नाही याविषयी बरीच चर्चा होत असते. काही लोक म्हणतात की हे लहान मुलांसाठी चांगले आहे तर काही जण हे लहान मुलांसाठी चुकीचे असल्याचे सांगतात. झुंबासंबंधीत या गोष्टी तुम्हाला माहित असायला हवे. चला तर जाणून घेऊया झुंबा म्हणजे काय आणि त्याचे मुलांसाठी असलेले फायदे.

ट्रेंडिंग न्यूज

काय आहे झुंबाः झुंबा हे डान्स आणि ॲरोबिक्सचे कॉम्बीनेशन आहे. यात मुलं आपल्या फेव्हरेट गाण्यासोबत मुव्ज करणे शिकतात. एकीकडे मुले गाणे ऐकतात तर दुसरीकडे आपली हेल्थ सुधरवतात. झुंबा मुलांची फिजीकल ग्रोथ सुधारते. मुलांसाठी झुंबा हे खेळ आणि डान्सचे एक चांगले ऑप्शन आहे.

झुंबाचे फायदेः झुंबा केल्याने मुलांना बराच फायदा होतो. यामुळे फुल बॉडी वर्कआउट होण्यासोबतच कॅलरीज आणि फॅट बर्न होतात. शरीराची लवचिकता वाढते, तणाव कमी होतो, मूड बूस्ट होतो आणि स्मरणशक्ती देखील सुधारते. याशिवाय मुले नवीन लोकांना भेटतात, नवीन मित्र बनवतात. तसेच त्यांचे इमॅजिनेशन आणि क्रिएटिव्हीटी चांगली होते.

किती कॅलरी होते बर्नः रिपोर्ट्स नुसार रोज एक तास झुंबा केला तर ३०० ते ४०० कॅलरी बर्न होतात. जे ५० मिनीट सायक्लिंग केल्याने आणि ७२ मिनीट वॉक करण्यासारखे आहे.

कसा केला जातो झुंबाः झुंबाला चार पार्टमध्ये डिव्हाइड केले गेले आहे. ज्यात वॉर्मअप सोबत स्ट्रेचिंग आवश्यक आहे. यानंतर ट्रेनर मुलांना मुव्ह सांगतात आणि मुले त्या मुव्ह फॉलो करतात. याशिवाय म्युझिकसाठी ॲक्टिव्हिटी केली जातात. शेवटी आराम करण्यासाठी ब्रिदींग सोबत स्ट्रेचिंग एक्सरसाइज केली जाते.

WhatsApp channel