मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Night Skin Care: झोपण्यापूर्वी हा फेसपॅक लावा, सकाळी मिळेल चमकणारी त्वचा!

Night Skin Care: झोपण्यापूर्वी हा फेसपॅक लावा, सकाळी मिळेल चमकणारी त्वचा!

Dec 13, 2023 12:00 AM IST

Glowing Skin: रात्री त्वचेवर हा फेसपॅक लावल्यास आवर्जून सकाळी चेहऱ्यावर चमक येईल.

Apply this face pack before sleeping
Apply this face pack before sleeping (Freepik)

Night Skin Care:दिवसभराच्या धावपळीत आपल्याला आपल्या त्वचेची काळजी घेणे शक्य होत नाही. बाहेरच्या धुळीमुळे त्वचा खराब होते. त्याच्यावरची चमक कमी होते. अशावेळी काय करावे सुचत नाही. तुम्हीही या समस्येने हैराण असाल आणि तुम्ही बाजारातील केमिकलयुक्त प्रोडक्स्ट वापरायचे नसतील. तर आम्ही काही टिप्स घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुम्हाला घरगुती नाईट फेस पॅक बनवण्याची पद्धत सांगणार आहोत. जे बनवायला आणि लावायलाही सोपे आहेत. चला जाणून घेऊया कसे बनतात हे फेस पॅक..

ट्रेंडिंग न्यूज

हळद आणि दुधाचा फेसपॅक

साहित्य

कच्चे दूध - ४ चमचे

हळद - १ टीस्पून

असा बनवा फेस पॅक

सर्व प्रथम, दोन्ही साहित्य एका भांड्यात मिसळा.

आता ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेच्या भागावर नीट लावा.

तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता.

सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुवा.

आपण ते प्रत्येक एक दिवसानंतर लागू करू शकता.

काय फायदे मिळतील?

दिवसभर धूळ आणि घाणीमुळे आपली त्वचा घाण होते. ही घाण आणि बॅक्टेरिया हळद दूर करते. कच्चे दूध आपल्या त्वचेसाठी चांगले असते. यामुळे चेहरा उजळतो आणि डाग कमी होतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel
विभाग