Personality Development: एखाद्याचे बोलण्याची पद्धत त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते. तुम्ही कमी-अधिक वेगाने कसे बोलत आहात, हे करिअर आणि आयुष्य दोन्हीसाठी महत्त्वाचे आहे. आपले बोलणे कसे असावे हे आपल्याला कळले पाहिजे. कधीकधी परिस्थिती अशी असते की गप्प बसणे चांगले ठरते. लोक काही ठिकाणी बोलण्याची चूक करतात आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या करिअरवर, आयुष्यावर आणि व्यक्तिमत्त्वावर दिसून येतो. जाणून घ्या कोणत्या ठिकाणी आपण मौन बाळगावे. तुमची ही पद्धत व्यक्तिमत्व वाढवण्याचे कामही करते.
> जर तुम्हाला खूप राग येत असेल तर शांत राहण्याचा प्रयत्न करा. अशा परिस्थितीत खूप कमी लोक स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात. राग प्रत्येकाच्या करिअरसाठी, व्यक्तिमत्त्वासाठी आणि आयुष्यासाठी हानिकारक आहे.
> जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण गोष्ट कळत नाही तोपर्यंत नेहमी शांत राहण्याचा प्रयत्न करा.
> तुमची नाती जपण्यासाठी कधी कधी गप्प बसणे उत्तम ठरते.
> ज्यांना मोठ्याने बोलण्याशिवाय बोलता येत नाही, त्यांनी बहुतांशी परिस्थितीत गप्प बसावे.
> तुमच्या बोलण्याने मैत्रीचे नुकसान होत असेल तर शांत राहण्याचा प्रयत्न करा.
> चुकून एखाद्या व्यक्तीला वाईट वाटेल अशी परिस्थिती उद्भवली तर गप्प बसणे चांगले.
> जेंव्हा तुम्हाला अति भावना जाणवेल तेंव्हा तुम्ही गप्प बसावे.
कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा भाग आहे. काही परिस्थितींमध्ये, शांत राहण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. पण बोलण्याची पद्धतही सुधारली पाहिजे. कोणत्याही विषयावर माहिती असेल तेव्हाच बोला. याशिवाय वेगाने बोलणे किंवा ओरडणे टाळा. तुमची ही सवय इतरांसमोर तुमचं वाईट इंप्रेशन पाडेल.