मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Personality Development: कामाच्या ठिकाणी 'असं' वागू नकात, नाही तर इमेज होईल खराब!

Personality Development: कामाच्या ठिकाणी 'असं' वागू नकात, नाही तर इमेज होईल खराब!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Apr 08, 2023 11:49 AM IST

Success Mantra: स्वतःच्या व्यक्तिमत्वावर स्वतःलाच काम करावं लागते.आपण काम करतो तिकडे काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत.

Personality Development Tips
Personality Development Tips (Freepik)

तुम्ही नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय, कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी केवळ कामावरच नव्हे तर व्यक्तिमत्त्वावरही लक्ष केंद्रित करावे लागते. करिअर आणि जीवनात व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व काय आहे हे समजून घेतले पाहिजे. आपण काम करतो तिकडे काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. ज्यामुळे आपलं नुकसान होता आणि आपला आत्मविश्वास कमी होतो. यासोबतच आपल्या सहकाऱ्याच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण होऊ शकते.आज अशाच काही सवयींबद्दल जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

इतरांना त्रास देणे

कामाच्या ठिकाणी कामाबद्दल आपल्या सहकाऱ्यांशी बोलणे सामान्य आहे. पण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सतत त्रास देत असाल तर ही सवय तुमची इमेज खराब करू शकते. अशा प्रकारची सवय संपूर्ण ऑफिसमध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वाला खाली आणू शकते.

फोकस न करणे

कामाच्या ठिकाणी असे काही लोक असतात जे त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांना त्याची सवय होऊ लागते आणि त्याचे नुकसान उत्पादकतेवर होऊ लागते. कुठेतरी तुम्हीही या परिस्थितीचा सामना करत असाल तर यावर काम करा. कामात लक्ष केंद्रित करण्यासाठी, लक्ष्य निश्चित करण्यासारख्या काही पद्धतींचा अवलंब करा.

गप्पा मारणे

बोलणे किंवा आपली बाजू मांडणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्या या पद्धतीमुळे इतरांच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे. अशा प्रकारची सवय तुमची इमेज डाउन करू शकते. अशा परिस्थितीत लोक बोलणे टाळू लागतात आणि यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे मोठे नुकसान होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel