मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 17 Winner: पाचवी पास! कोण आहे 'बिग बॉस १७' विजेता मुनव्वर फारुकी जाणून घ्या

Bigg Boss 17 Winner: पाचवी पास! कोण आहे 'बिग बॉस १७' विजेता मुनव्वर फारुकी जाणून घ्या

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 29, 2024 09:05 AM IST

Who is munawar faruqui: 'बिग बॉस १७'चा ताज कोण जिंकणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता मुनव्वर फारुकीने हा ताज जिंकल्याचे समोर आले.

munawar faruqui
munawar faruqui

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून पाहिल्या जाणाऱ्या 'बिग बॉस १७'चा नुकताच महाअंतिम सोहळा पार पाडला. मनारा चोप्रा, अभिषेक कुमार, मुनव्वर फारुकी, अंकिता लोखंडे व अरुण हे स्पर्धक टॉप ५मध्ये होते. यामध्ये मुनव्वरने सर्वांना टक्कर देत 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले. आता मुनव्वर कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. चला जाणून घेऊया...

ट्रेंडिंग न्यूज

'बिग बॉस १७' हा शो जेव्हा पासून सुरु झाला तेव्हा पासून मुनव्वर फारुकी विजेतेपदाचा दावेदार मानला जात होता. त्याचा गेम हा सर्वांच्या पसंतीला उतरत होता. पण वैयक्तिक आयुष्मातील चढ उतरांमुळे मुनव्वरला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. पण सगळ्या संकटांवर मात करत मुनव्वरने 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफीवर स्वत:चे नाव कोरले.
वाचा: मुनव्वर फारुकीने जिंकला बिग बॉस १७ चा ताज, मिळाली इतकी रक्कम

मुनव्वर फारुकीने अभिनय क्षेत्रात करिअर केले आहे. त्यासोबतच तो स्टँडअप कॉमेडीयन आणि उत्तम रॅपर म्हणून देखील ओळखला जातो. तसेच 'बिग बॉस १७'च्या घरात त्याच्या कविता आणि शायरी विशेष गाजत होत्या. बॉलिवूड रॅपर बादशाहने मुनव्वरच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिली होती. तसेच काही गायकांनी देखील मुनव्वरला पाठिंबा दिला होता. मुनव्वरचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे त्याला करिअरमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. यापूर्वी तो अभिनेत्री कंगना रणौतच्या लॉकअप या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता.

मुनव्वरच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्याने पाचवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. कौटुंबिक अडचणींमुळे त्याला शाळा सोडावी लागली होती असा खुलासा 'बिग बॉस १७'मध्ये केला होता. तो गुजरातील जुनागड येथे लहानाचा मोठा झाला. आईच्या निधनानंतर तो मुंबईत आला. काही काळानंतर मुनव्वरने ग्राफिक डिझायनिंगचाही कोर्स केला होता. वडिलांच्या आजारपणामुळे अभिनेत्याला त्याचे शिक्षण सोडावे लागले होते. पुढे, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केल्यानंतर मुनव्वरने एका नामांकित एजन्सीच्या कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून देखील काम केले आहे. २०२०मध्ये मुनव्वरच्या वडिलांचे देखील निधन झाले.

IPL_Entry_Point

विभाग