छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून 'बिग बॉस' पाहिला जातो. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या बिग बॉसचे १७वे पर्व हे चर्चेत आहे. यंदा कोणता स्पर्धक 'बिग बॉस १७'च्या ट्रॉफिवर स्वत:चे नाव कोरणार? असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता बिग बॉस १७चा विजेता समोर आला आहे.
'बिग बॉस १७'चा विजेता कोण होणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. टॉप ३ स्पर्धकांमध्ये मुनव्वर सिद्दीकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांचा समावेश होता. या तिघांनी जोरदार टक्कर दिली. अखेर मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस १७'चा ताज स्वत:च्या नावे केला.
वाचा: 'या' आठवड्यात हे चित्रपट आणि वेबसीरिज होणार रिलीज
मुनव्वर हा रॅपर आणि स्टँडअप कॉमेडीयन आहे. बिग बॉस १७ पूर्वी तो अभिनेत्री कंगना रणौतच्या 'लॉक अप' या रिअॅलिटी शोमध्ये दिसला होता. मुनव्वरचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल आहे. तो नेहमीच व्हिडीओ शेअर करताना दिसतो.
'बिग बॉस १७'च्या विजेत्याला एक ट्रॉफी, आलिशान कार आणि ५० लाख रुपयांचे रोख बक्षिस मिळणार आहे. या बक्षिसाने एखाद्या स्पर्धकाचे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे. त्यामुळे कोणता स्पर्धक ट्रॉफीवर त्याचे नाव कोरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या यंदाच्या सीझनबद्दल सांगायचे झाले तर, गेल्या ३ महिन्यांपासून या पर्वाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात १७ व्या पर्वाला सुरुवात झाली होती. अभिषेक कुमार, इशा मालवीय, आएशा खान, मुनव्वर फारुकी, मनस्वी ममगई, सना खान, अरुण माशेट्टी, सनी आर्या, खानजादी, रिंकू धवन, जिग्ना वोरा, सोनिया बन्सल, नाविद सोल, अनुराग डोबाल, समर्थ जुरैल, मनारा चोप्रा, अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील-ऐश्वर्या हे स्पर्धक सहभागी झाले होते.