मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Virat-Anushka: ‘या’ ठिकाणी झाली विराट-अनुष्काची पहिली भेट; अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी!

Virat-Anushka: ‘या’ ठिकाणी झाली विराट-अनुष्काची पहिली भेट; अशी सुरु झाली होती लव्हस्टोरी!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 11, 2022 09:21 AM IST

Virat-Anushka Wedding Anniversary: ११ डिसेंबर २०१७मध्ये अनुष्का आणि विराट कोहली यांनी लग्नगाठ बांधली होती. इटलीतील एका खाजगी सोहळ्यात त्यांनी सात फेरे घेतले होते.

Anushka-Virat
Anushka-Virat

Virat-Anushka Wedding Anniversary: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची जोडी केवळ क्रिकेटविश्वातच नाही, तर मनोरंजन विश्वात देखील प्रसिद्ध आहे. ११ डिसेंबर २०१७मध्ये अनुष्का आणि विराट कोहली यांनी लग्नगाठ बांधली होती. इटलीतील एका खाजगी सोहळ्यात विराट आणि अनुष्का यांनी सात फेरे घेतले होते. त्यांची लव्हस्टोरी देखील खूप खास आहे. एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान त्यांची पहिली भेट झाली होती.

ट्रेंडिंग न्यूज

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट २०१३ मध्ये झाली होती. दोघांनी मिळून एका शॅम्पू ब्रँडच्या जाहिरातीसाठी शूट केले. या दरम्यानच्या काळात विराटने क्रिकेट विश्वात आपली दमदार खेळी दाखवत होता. तर, अनुष्काही मनोरंजन विश्वात चांगली कामगिरी करत होती. मात्र, त्यांची ही पहिली भेट फारशी खास नव्हती. पहिल्याच भेटीत विराट खूप नर्व्हस होता. अनुष्काला पाहताच त्याने तिच्या हाय हिल्सवर एक विनोद केला, ज्यामुळे ती चिडली होती.

या जाहिरातीच्या शूटनंतर विराट आणि अनुष्काच्या भेटीगाठी वाढू लागल्या. आधी मैत्री आणि नंतर हळूहळू दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं. पण, विराट आणि अनुष्काने आपलं नातं नेहमीच मीडियापासून दूर ठेवलं होतं. दोघेही आपल्या नात्याचा आनंद लुटत होते. मात्र, यादरम्यान विराट आणि अनुष्का अधिकाधिक एकत्र दिसले, त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या बातम्या मीडियामध्ये आगीसारख्या पसरल्या. मात्र, त्यांनी नेहमीच सगळ्या चर्चा फेटाळून लावल्या.

मात्र, एका सामन्यादरम्यान अर्धशतक झळकावल्यानंतर विराटने बॅटने इशारा करत अनुष्काला फ्लाइंग कीस देत दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. विराट आणि अनुष्काने ज्या प्रकारे आपलं नातं लपवून ठेवलं, त्याचप्रमाणे त्यांचे लग्नही गुपचूप पार पडले. दोघांनी इटलीतील टस्कनी येथे एक सिक्रेट डेस्टिनेशन वेडिंग केले होते, याचा खुलासा दोघांनी लग्नाचे फोटो शेअर करून केला होता. आता या जोडीला ‘वामिका’ नावाची एक मुलगी आहे.

IPL_Entry_Point