गेल्या काही दिवसांपासून वेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जाणू काही जादूच केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी वेड या चित्रपटाची कमाई सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितली आहे. 'पहिल्या दिवशी म्हजेच गेल्या शुक्रवारी चित्रपटानं २.२५ कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी या आकडा वाढला, चित्रपटाची ३.२५ कोटींची कमाई झाली होती. तिसऱ्या दिवशी ४.५० कोटी, चौथ्या दिवशी ३.०२ कोटी तर पाचव्या दिवशी चित्रपटानं अनुक्रमे २.६५ कोटींचा गल्ला जमल्याचं समोर आलं. सहाव्या दिवशी चित्रपटानं २.४५ कोटींची कमाई केली.तर एका आठवड्याच चित्रपटानं एकूण २०.६७ कोटीं कमावले आहेत' या आशयचे ट्वीट तरण आदर्शने केले आहे.
वेड या चित्रपटाने आणखी एक रेकॉर्ड केला आहे. आजवर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये वीकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे. हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर सैराट आहे. या चित्रपटाने १२.१० कोटी कमावले होते. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर टाइमपास २ आहे. या चित्रपटाने ११ कोटींचा गल्ला जमावला होता. नटसम्राट हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने १०.२५ कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर रितेशचा लय भारी चित्रपट आहे. या चित्रपटाने १०.५५ कोटी कमावले होते. आता १० कोटी कमावत वेड चित्रपट या यादीमध्ये सहभागी झाला आहे.