मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Varun Dhawan: वरुण धवन गंभीर आजारानं ग्रस्त; स्वत:च्या शरीरावर राहत नाही ताबा

Varun Dhawan: वरुण धवन गंभीर आजारानं ग्रस्त; स्वत:च्या शरीरावर राहत नाही ताबा

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 05, 2022 01:37 PM IST

Varun Dhawan Health News: वरुणने आगामी चित्रपट ‘भेडिया’च्या प्रमोशन वेळी हा खुलासा केला आहे.

वरुण धवन
वरुण धवन (HT)

Varun Dhawan: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता वरुण धवन चर्चेत आहे. या चर्चा वरुणचा आगामी चित्रपट 'भेडिया'मुळे रंगल्या होत्या. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेनॉन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. आता वरुण या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, त्याने खासगी आयुष्याविषयी काही गोष्टींचा खुलासा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वरुण धवन गेल्या काही दिवसांपासून वेस्टीबुलर हायपोफंक्शनने ग्रस्त आहे. या आजारामध्ये व्यक्ती स्वत:च्या शरीरावरील ताबा गमावतो. लॉकडाउननंतर जेव्हा हळूहळू गोष्टी रुळावर येऊ लागल्या त्यावेळी वरुणला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. जेव्हा वरुण धवनला त्याच्या या आजाराविषयी कळाले तेव्हा धक्का बसला. तो नैराश्यामध्ये गेला होता. तो यावर मात करण्यासाठी अनेक गोष्टी करत होता.

'जेव्हा आम्ही घराचे दरवाजे उघडले तेव्हा मला जाणवले की बाहेर सुरू असलेल्या शर्यतीमध्ये मला उतरावे लागणार आहे. इथे बसलेले किती लोक सांगू शकतात की ते बदलले आहेत. उलट लोक आता पहिल्यापेक्षा जास्त मेहनत करताना दिसत आहेत. मी स्वत:ला जुग जुग जियो या चित्रपटासाठी इतके प्रेशराइज केले की कोणत्या तरी निवडणूकीसाठी मी उभा आहे अशी भावना मनात येऊ लागली होती. मला नाही माहिती मी स्वत:वर इतका ताण का टाकला' असे वरुण धवन म्हणाला.

'भेडिया' या चित्रपटाची दिनेश विजानने निर्मिती केली आहे. या चित्रपटात वरुणसोबत क्रिती सेनॉन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी त्यांनी 'दिलवाले' चित्रपटात एकत्र काम केले होते. आता त्यांचा भेडिया हा चित्रपट २५ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट २डी आणि ३डीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग