मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Valentines Day 2023: शूटिंग दरम्यान प्रेम फुललं आणि खऱ्या आयुष्यात लग्न केलं! बॉलिवूडच्या ‘या’ जोड्या माहितीयेत?

Valentines Day 2023: शूटिंग दरम्यान प्रेम फुललं आणि खऱ्या आयुष्यात लग्न केलं! बॉलिवूडच्या ‘या’ जोड्या माहितीयेत?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 14, 2023 10:27 AM IST

Valentines Day 2023 Special: प्रेम आणि बॉलिवूड हे समीकरण तसं जुनंच आहे. बॉलिवूड चित्रपट म्हटले की, त्यात प्रेम आणि रोमान्स भरभरून असतो.

Valentines Day 2023
Valentines Day 2023

Valentines Day 2023 Special: जगभरात आजचा (१४ फेब्रुवारी) दिवस हा प्रेमाचा अर्थात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोड्या आपलं जोडीदारावरील प्रेम व्यक्त करतात. आता प्रेम आणि बॉलिवूड हे समीकरण तसं जुनंच आहे. बॉलिवूड चित्रपट म्हटले की, त्यात प्रेम आणि रोमान्स भरभरून असतो. पण आजच्या या खास दिवशी आपण अशा काही जोड्यांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचं प्रेम सेटवर फुललं आणि त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात लग्नगाठ बांधली. आजही या जोड्या बॉलिवूडचे ‘बेस्ट कपल’ म्हणून ओळखल्या जातात.

ट्रेंडिंग न्यूज

काजोल-अजय देवगण

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगण यांची पहिली भेट १९९५मध्ये ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या चार वर्षानंतर त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, काजोलने जेव्हा आपला हा निर्णय वडिलांना सांगितला होता, तेव्हा त्यांनी काजोलशी बोलणं टाकलं होत. मात्र, यानंतर सगळं काही सुरळीत झालं.

जया-अमिताभ बच्चन

मीडिया रिपोर्टनुसार, जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांची पहिली भेट १९७०मध्ये पुणे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झाली होती. यावेळी त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती. मात्र, ‘गुड्डी’ या चित्रपटाच्या सेटवर त्यांची प्रेमकथा फुलली. तर, ‘एक नजर’ या चित्रपटात एकत्र झळकल्यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

जिनिलीया-रितेश देशमुख

जिनिलीया आणि रितेश देशमुख २००३मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. या सेटवर त्यांची मैत्री झाली. नऊ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर, ३ फेब्रुवारी २०१२ रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली. ‘तेरे नाल लव हो गया’, ‘मस्ती’, ‘लय भारी’ आणि ‘वेड’ यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे.

 

ट्विंकल-अक्षय कुमार

अक्षय कुमार आणि ट्विंकल यांची पहिली भेट फिल्मफेअर मासिकाच्या शूटमध्ये झाली होती. पहिल्याच भेटीत अक्षय ट्विंकलच्या प्रेमात पडला होता. १९९९मध्ये ‘इंटरनॅशनल खिलाडी’च्या शूटिंग दरम्यान दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. यानंतर १७ जानेवारी २००१ रोजी या जोडीने एकमेकांशी लग्नगाठ बांधली.

दीपिका-रणवीर सिंह

बॉलिवूडचे ‘पॉवर कपल’ दीपिका आणि रणवीर यांनी २०१३मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात प्रेम फुलले. जवळपास सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१८मध्ये या जोडीने लग्न केले. या जोडीने ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

IPL_Entry_Point

विभाग