बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला यांच्या सुंदरतेची आजही प्रचंड चर्चा होत असते. त्या त्यांच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिल्या आहेत. त्यांचबरोबर तिचं नाव नेहमीच अनेक लोकांशी जोडलं गेलं. परंतु मीडिया रिपोर्टनुसार मधुबाला या प्रसिध्द अभिनेते दिलीप कुमार यांच्याबरोबर सिरियस रिलेशनशिपमध्ये होत्या. त्यावेळी संपूर्ण बॉलिवूडमध्ये त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत्या. ते तब्बल ९ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. ऐन लग्नाच्या वेळी दोघांनी वेगवेगळ्या वाटा पकडल्या होत्या. आज १४ फेब्रुवारी रोजी मधुबालाचा वाढदिवस त्यानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी...
मधुबालाशी लग्न करण्यासाठी दिलीप कुमार यांनी मुस्लीम धर्म स्विकारल्याचे म्हटले जाते. विवाहीत असलेले किशोर कुमार मधुबालाच्या प्रेमात पडले होते. ज्यावेळी किशोर कुमार यांनी मधुबालासमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यावेळी मधुबाला स्वतःच्या उपचारासाठी विदेशी जात होत्या. मधुबालाने किशोर कुमार यांच्या प्रेमाला स्वीकार केला आणि अखेर ते दोघे विवाहबंधनात अडकले. किशोर कुमार यांचं हे दूसरं लग्न होतं. मधुबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी त्यांचं नाव बदलून अब्दुल करीम असं केलं होतं.
वाचा: विरोधानंतरही 'पठाण' सिनेमा लोकप्रिय का झाला?; खुद्द शरद पवारांनी सांगितलं!
किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या नात्याला कुटुंबीयांनी नेहमी विरोध केला. मात्र सर्वांचा विरोध पत्कारून त्यांनी लग्न केले होते. मात्र त्यांच्या संसार फार काळ टिकला नाही. मधुबाला यांच्या हृदयाला छिद्र होते. त्यांनी परदेशातही उपचार घेतले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी मधुबालाचे निधन झाले.
मधुबालाने वयाच्या ९व्या वर्षापासून बालकलाकार म्हणून चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. तिने ७१ चित्रपटात काम करून कोट्यावधी लोकांच्या मनात घर केले होते.
संबंधित बातम्या