मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urfi Javed: ‘मी तर माझ्या कपड्यांमुळे प्रसिद्ध म्हणून...’; कंगनाच्या ट्वीटवर उर्फीची भन्नाट प्रतिक्रिया!

Urfi Javed: ‘मी तर माझ्या कपड्यांमुळे प्रसिद्ध म्हणून...’; कंगनाच्या ट्वीटवर उर्फीची भन्नाट प्रतिक्रिया!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 31, 2023 07:37 AM IST

Urfi Javed And Kangana Ranaut : बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत हिची देखील ट्विटरवर नुकतीच वापसी झाली आहे. दरम्यान यावेळी उर्फी थेट कंगनाची थट्टा करताना दिसली आहे.

Urfi Javed And Kangana Ranaut
Urfi Javed And Kangana Ranaut

Urfi Javed And Kangana Ranaut : मॉडेल-अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अगदी सामान्य चाहत्यांच्या प्रतिक्रियांवर देखील ती उत्तर देते. मात्र, आता उर्फी चर्चेत आली आहे ती तिच्या आणि कंगना रनौत यांच्या ट्विटर चर्चेमुळे... बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अभिनेत्री कंगना रनौत हिची देखील ट्विटरवर नुकतीच वापसी झाली आहे. दरम्यान यावेळी उर्फी थेट कंगनाची थट्टा करताना दिसली आहे. दोघींमधला हा ट्विटर संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्विटरवर वापसी होताच कंगना चांगलीच सक्रिय झाली आहे. एक ट्वीट शेअर करत कंगनाने म्हटले होते की, या देशातील लोक सगळ्या खानांवर प्रेम करतात आणि त्यांना फक्त मुस्लीम अभिनेत्रीच आवडतात. यावर उर्फीने देखील प्रतिक्रिया दिली. उर्फी म्हणाली की, ‘हे कसले विभाजन.. हिंदू कलाकार, मुस्लीम कलाकार. कला कधीच धर्मात विभागली जाऊ शकत नाही. सगळेच कलाकार आहेत.’ यानंतर दोघींमध्ये चांगलीच टीवटीव रंगली होती.

कंगनाने देखील उर्फीला उत्तर देत म्हटले की, ‘प्रिय उर्फी तुझा विचार चांगला आहे. मात्र, त्यासाठी आपल्या देशाला युनिफॉर्म सिव्हील कोडची गरज आहे. तोपर्यंत राज्यघटनेनुसार देश या दोन भागांमध्ये विभागलेला राहील. सगळ्यांनी मिळून २०२४पर्यंत देशात समान नागरी कायदा लागू व्हावा अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करूया.’ यावर देखील उर्फीने प्रतिक्रिया दिली. उर्फी ट्वीट करत म्हणाली, ‘युनिफॉर्म नको मॅडम.. मी तर माझ्या कपड्यांमुळे प्रसिद्ध आहे.’ उर्फीचं हे ट्वीट वाचून अनेकांना हसू आलं आहे.

कंगनाने म्हटलेल्या ‘युनिफॉर्म सिव्हील कोड’चा अर्थ आहे समान नागरी कायदा. मात्र, उर्फीने युनिफॉर्म या शब्दाचा अर्थ कपड्यांशी लावल्याने ती ट्रोल देखील झाली. मात्र, यानंतर स्वतः उर्फीने पुन्हा एकदा ट्वीट करता आपण केवळ गंमत करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, दोघींमधील हा संवाद आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

IPL_Entry_Point