मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये झाले भांडण? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Viral Video: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायमध्ये झाले भांडण? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 30, 2023 07:17 PM IST

Aishwarya Rai: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याने चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमधील एका व्हिडीओने या चर्चा रंगल्या आहेत.

अभिषेक
अभिषेक (HT)

बॉलिवूडमधील अतिशय सुंदर अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या राय बच्चन ओळखली जाते. तिने सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केले आहे. लग्नानंतर बॉलिवूडमधील आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते दोघे नेहमी एकत्र फिरताना दिसतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्यांच्यामध्ये काही तरी बिनसले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्याने चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या बर्थडे पार्टीला हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्याने निळ्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये ऐश्वर्या ग्लॅमरस दिसत आहे. तर दुसरीकडे अभिषेकने राखाडी रंगाचा आऊटफिट घातला आहे. सध्या सोशल मीडियावर त्या दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला कपलची गेट जवळ एण्ट्री होते. ते एकत्र एण्ट्री करतात. त्यानंतर तेथील फोटोग्राफर पोझ देण्यासाठी सांगतात. तेवढ्यात ऐश्वर्या उलटी फिरते आणि अभिषेककडे रागाने पाहाते. त्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या तेथून निघून जातात.

सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेकचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुन त्या दोघांमध्ये भांडणे सुरु असल्याचे म्हटले जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता उधाण आले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग