मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; 'फेमस होणारच'मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक

Upendra Limaye: रांगडं व्यक्तिमत्व आणि भारदस्त संवाद पुन्हा एकदा अनुभवता येणार; 'फेमस होणारच'मधून उपेंद्र लिमयेंचं कमबॅक

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2023 01:22 PM IST

Upendra Limaye New Marathi Movie: अॅक्शन पट म्हटलं की, उपेंद्र यांचा आतापर्यंतचा अभिनय आणि त्यांचं जबरी बोलणं आठवतं. आता अभिनेते उपेंद्र लिमये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत.

Upendra Limaye
Upendra Limaye

Upendra Limaye New Marathi Movie: नवकलाकारांची चलती असतानाही अनुभवी आणि दिग्गज कलाकारांचं चित्रपटात असणं नेहमीच लक्षणीय असत. रांगड्या व्यक्तिमत्वाने आणि जबरदस्त अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या अभिनेत्यांमध्ये उपेंद्र लिमये यांचे नावही अग्रक्रमी आहे. उपेंद्र लिमये यांच्याबद्दल ही बोलावं तितकं कमीच आहे. अॅक्शन पट म्हटलं की, उपेंद्र यांचा आतापर्यंतचा अभिनय आणि त्यांचं जबरी बोलणं आठवतं. हे सर्व पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासाठी अभिनेते उपेंद्र लिमये पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 'फेमस होणारच' या आगामी ऍक्शन पटातून अभिनेते उपेंद्र लिमये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

'फेमस होणारच' या चित्रपटात उपेंद्र लिमये या दिग्गज कलाकारासह अभिनेता महेश गायकवाड, अक्षया हिंदळकर, पूजा राजपूत, तेजस्विनी सुनील, प्रदीप शिंदे, प्रेम धर्माधिकारी, विजय निकम, अक्षय अशोक म्हस्के या कलाकारांना पाहणं ही रंजक ठरणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा पेलवली आहे. अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाची जबाबदारी नवोदित दिग्दर्शक अक्षय गवसाने याने उत्तमरीत्या पेलवली आहे.

गवसाने प्रॉडक्शन हाऊस' आणि 'गायकवाड सन्स प्रॉडक्शन हाऊस' प्रस्तुत तसेच, 'ए. जी प्रॉडक्शन हाऊस' यांच्या संयुक्त विद्यमाने दिग्दर्शक अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित 'फेमस' हा नवाकोरा अॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली आहे. लवकरच 'फेमस होणारच' हा अॅक्शन पट मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग