मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: घर बळकावण्यासाठी शिल्पी घेणार आईचा आधार? ‘तू चाल पुढं’मध्ये काय घडणार? वाचा...

Tu Chal Pudha: घर बळकावण्यासाठी शिल्पी घेणार आईचा आधार? ‘तू चाल पुढं’मध्ये काय घडणार? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 06, 2023 02:25 PM IST

Tu Chal Pudha Latest Episode : शिल्पी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करतेय ही गोष्ट विक्रमच्या लक्षात आल्याने त्याने शिल्पीला मदत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच आता शिल्पी आपल्या आईचा आधार घेणार आहे.

Tu Chal Pudha
Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode:तू चाल पुढं’ या मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अश्विनी आणि श्रेयसला घराबाहेर काढण्यासाठी आता शिल्पी नवा डाव खेळणार आहे. अश्विनीला बेघर करण्यासाठी आता शिल्पी नवी खेळी खेळणार आहे. विद्युतशी घटस्फोट घेतल्यानंतर शिल्पीने विक्रमचा हात धरला होता. मात्र, शिल्पी केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करतेय ही गोष्ट आता त्याच्या लक्षात आल्याने त्याने शिल्पीला मदत करण्यास नकार दिला आहे. त्यामुळेच आता शिल्पी आपल्या आईचा आधार घेणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बरेच दिवस घरापासून लांब असलेले श्रेयस आणि शिल्पीचे बाबा आता घरी परतून आले आहेत. मित्राच्या मृत्यूमुळे ते अचानक खचून गेले आहेत. यावेळी त्यांनी मित्राचं उदाहरण गाठीशी बांधून स्वतःचं मृत्यूपत्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे. आपली संपत्ती अर्थात राहतं घर त्यांनी दोन्ही मुलांमध्ये समान वाटणी करून देण्याचं ठरवलं आहे. मात्र, यात त्यांच्या पत्नीने विरोध दर्शवला आहे. घर दोन्ही मुलांमध्ये वाटणी करण्याऐवजी एकट्या शिल्पीला ते देण्यात यावं असं तिने म्हटलं. यावर जरी बाबांनी आक्षेप घेतला असला, तरी आईने आपला हट्ट लावून धरला आहे.

Rang Maza Vegla : अखेर दीपाला कळणार कार्तिकचं सत्य; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार धक्कादायक वळण!

अश्विनी आणि श्रेयस दोघांचं चौकोनी कुटुंब आता सुखवस्तू आहे. श्रेयस आणि अश्विनी आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतात. मात्र, शिल्पी आता एकटी पडली आहे. तिच्याकडे स्वतःचं कुणी नाही.शिल्पीचा घटस्फोट झाला आणि आता ती एकटीच आहे. त्यामुळे घर एकट्या शिल्पीच्या नावे करण्यात यावं, असा हट्ट उज्ज्वलाने धरला आहे. तर, आपल्यामागे आपल्या मुलीवर वाईट वेळ येईल, अशी भीती त्यांना वाटत आहे. मात्र, हा सगळा डाव शिल्पीनेच आखला आहे. तिनेच आईच्या मनात विष पेरून घर बळकावण्याचा प्रयत्न केला आहे.

आता शिल्पीचा हा डाव अश्विनी आणि बाबांच्या लक्षात येणार का? बाबा घरच्या बाबतीत काय निर्णय घेणार? अश्विनी आणि श्रेयस घर सोडून बाहेर पडणार का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग