मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: अश्विनीच्या नव्या प्रवासाला होणार सुरुवात; श्रेयससह कुटुंबाची मिळणार साथ!

Tu Chal Pudha: अश्विनीच्या नव्या प्रवासाला होणार सुरुवात; श्रेयससह कुटुंबाची मिळणार साथ!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 03, 2023 03:42 PM IST

Tu Chal Pudha Latest Episode: ‘तू चाल पुढं’ या मालिकेत आता अश्विनीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे.

Tu Chal Pudha
Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode:तू चाल पुढं’ या मालिकेत आता अश्विनीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे. मिसेस इंडिया झाल्यानंतर आता अश्विनीकडे अनेक नव्या संधी चालून येत आहेत. परंतु, अश्विनीने आता तिचा स्वतःचा वेगळा मार्ग निवडला आहे. अश्विनी वाघमारेने आता स्वतःचं नवं युट्यूब चॅनेल सुरू केलं असून, ती यातून सगळ्यांना ब्युटी टिप्स देत आहे. यातूनच आता अश्विनी डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. तर, दुसरीकडे तिचे संपूर्ण वाघमारे कुटुंब तिला यात साथ देणार आहे.

आपलं पार्लर आणि हा व्यवसाय वाढवा यासाठी अश्विनी आता नवनवे फंडे वापरत आहे. ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेची उपविजेती ठरल्यानंतर अश्विनीकडे आधीच नव्या ग्राहकांची गर्दी वाढली आहे. मात्र, सध्या तिचे सुरू असलेले पार्लर सध्या फारच छोटे वाटू लागले आहे. त्यामुळे आता अश्विनी आपलं पार्लर वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी ती पार्लरमध्ये एक नवी खुर्ची आणणार आहे. दरम्यान तिच्या लेकीने म्हणजेच मयुरीने तिला डिजिटल विश्वाची ओळख करून दिली आहे.

Shah Rukh Khan: विमानतळावरून बाहेर येणाऱ्या शाहरुख खानने चाहत्याचा फोन भिरकावला? पाहा व्हिडीओ...

युट्यूब व्हिडीओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्विनी आता प्रत्येकाच्या घराघरांत पोहोचणार आहे. तर, आता सोशल मीडिया स्टार बनून ती आपला व्यवसाय आणखी मोठा करणार आहे. तिच्या या प्रवासात आता तिला पती श्रेयस, मुलगी मयुरी यांच्यासह संपूर्ण कुटुंब आणि मित्रपरिवार यात तिची साथ देणार आहे. या सगळ्यांच्या साथीने अश्विनी तिचा नवा प्रवास सुरू करणार आहे. दुसरीकडे शिल्पीशी दोन हात करण्यासाठी देखील अश्विनीला तयार व्हावं लागणार आहे.

लवकरच शिल्पी अश्विनीला घराबाहेर काढणार आहे. अश्विनी आणि श्रेयस याचा बदला घेण्यासाठी शिल्पीने नवा डाव रचला आहे. वाघमारे कुटुंबाचं घर स्वतःच्या नावावर करून आता शिल्पी आपल्या भावाला त्याच्या संपूर्ण कुटुंबासह बेघर करणार आहे. मात्र, यातूनही अश्विनी पुढे येऊन आपल्या कुटुंबाचं रक्षण करणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग