मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prakash Raj: द कश्मीर फाइल्सला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळताच प्रकाश राज यांनी केले ट्वीट

Prakash Raj: द कश्मीर फाइल्सला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळताच प्रकाश राज यांनी केले ट्वीट

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 23, 2023 01:20 PM IST

The Kashmir Files: गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज आणि द कश्मी फाइल्स चित्रपटाच्या दिग्दर्शकामध्ये भांडण सुरु असल्याचे दिसत आहे. आता चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर पुन्हा प्रकाश राज यांनी ट्वीट करत लक्ष वेधले आहे.

विवेक अग्निहोत्री
विवेक अग्निहोत्री (HT)

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते प्रकाश राज हे सतत त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट आणि वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ते सामाजिक विषयांवर बिनधास्तपणे त्यांचे मत मांडताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून प्रकाश राज आणि 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री यांच्यामध्ये चांगलीच जुंफली होती. आता 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावर प्रकाश राज यांनी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘द काश्मीर फाइल्स’ हा २०२२ मधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित काश्मिरी पंडितांच्या नरसंहारावर आधारित हा चित्रपट होता. हा चित्रपट ऑस्करमध्ये शॉर्टलिस्ट झाल्याचा दावा विवेक अग्निहोत्रीने केला. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. प्रकाश राज यांनी त्यानंतर ट्वीट करत त्यांची खिल्ली उडवली. आता याच चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर प्रकाश राज यांनी केलेल्या ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
वाचा: फक्त २० हजार मतं..; प्रकाश राज यांना विवेक अग्निहोत्रीने पुन्हा डिवचले

प्रकाश राज यांनी एका आर्टिकलचा स्क्रिनशर्ट शेअर केला आहे. हा स्क्रिनशर्टल शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये दोन हॅशटॅग्सचा वापर केला. प्रोपोगंडा फाइल्स आणि जस्ट आस्ककिंग हे दोन हॅशटॅग्स प्रकाश राज यांच्या या ट्वीटमध्ये दिसत आहेत. प्रकाश राज यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले.

प्रकाश राज
प्रकाश राज (HT)

यापूर्वी प्रकाश राज यांनी ट्वीट करत, “काश्मीर फाइल्स हा एक वाईट चित्रपट आहे, पण त्याची निर्मिती कोणी केली हे आपल्याला माहीत आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरी त्यांच्यावर थुंकतात आणि चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणतो मला ऑस्कर का मिळत नाही? ऑस्कर काय त्याला भास्करही मिळणार नाही. कारण बाहेर संवदेनशील माध्यम आहेत इथे तुम्ही हेतूपूर्वक चित्रपट बनवू शकता. माझ्या सूत्रांच्या माहितीनुसार हा चित्रपट बनवण्यासाठी २०० कोटी खर्च केले आहेत” असे म्हटले होते.

द कश्मीर फाइल्स या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटावर प्रचंड टीका झाली होती.

IPL_Entry_Point

विभाग