मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sushat Singh Rajput: अडीच वर्ष उलटूनही सुशांत सिंह राजपूतच्या घराला नवा भाडेकरू मिळेना!

Sushat Singh Rajput: अडीच वर्ष उलटूनही सुशांत सिंह राजपूतच्या घराला नवा भाडेकरू मिळेना!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 11, 2022 10:24 AM IST

Sushat Singh Rajput: वांद्रे स्थित एका इमारतीत सुशांत सिंह राजपूत याचा हा आलिशान सी फेसिंग फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूत भाडेकरू म्हणूनच राहत होता.

Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput

Sushat Singh Rajput: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता जवळपास अडीच वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, आजही चाहते त्याच्या आठवणीत भावूक होताना दिसतात. वांद्रे स्थित घरात त्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर या घराला अद्याप नवा भाडेकरू मिळालेला नाही. सुशांतनंतर अजूनही हा फ्लॅट रिकामाच पडला आहे. रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित हा फ्लॅट भाड्याने द्यायची जाहिरात शेअर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

वांद्रे स्थित एका इमारतीत सुशांत सिंह राजपूत याचा हा आलिशान सी फेसिंग फ्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये सुशांत सिंह राजपूत भाडेकरू म्हणूनच राहत होता. या फ्लॅटचे एका महिन्याचे भाडे तब्बल ५ लाख रुपये इतके आहे. तर, सुशांतच्या आत्महत्येनंतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला किंवा मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींना हे घर भाड्यावर द्यायचे नाही, असा निर्णय घर मालकाने घेतला आहे. या घरात एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्तीने राहावे अशी, घरमालकाची इच्छा आहे. मात्र, अजून असा भाडेकरू मिळालेला नाही.

याबद्दल बोलताना रिअल इस्टेट ब्रोकर रफिक मर्चंट म्हणाले की, ‘आधी लोक या फ्लॅटमध्ये येण्यास घाबरायचे. आजही जेव्हा एखादा व्यक्ती हे घर बघायला येतो, आणि याच घरात सुशांतने आत्महत्या केली होते हे कळतं, तेव्हा नकारच ऐकू येतो. आता सुशांतच्या मृत्यूला बराच काळ लोटल्याने अनेक लोक हा फ्लॅट बघण्यासाठी येत आहेत. मात्र, अजूनही या घरासाठी नवा भाडेकरू मिळालेला नाही. तसेच, या घराचा मालक घरभाडे कमी करण्यास देखील तयार नाही.’

सुशांतचे वास्तव्य असणारे हे घर अद्याप रिकामे असण्याला अनेक करणे आहेत. घर मालक भाडे कमी करत नसल्याने, ग्राहक याच किंमतीत दुसरा एकदा फ्लॅट बघून त्याची निवड करतो. याच किंमतीतील दुसऱ्या एखाद्या घरामागे कोणताही वाद नसेल, हेच यामागचे मुख्य कारण आहे. सुशांत सिंह राजपूत याने डिसेंबर २०१९मध्ये हे घर दर महिना ४.५ लाख रुपये मोजून भाडेतत्वावर घेतले होते. याच घरात सुशांत आपली कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यासोबत राहत होता. मात्र, १४ जून २०२० रोजी सुशांतने गळफास घेत आपले आयुष्य संपवले होते.

IPL_Entry_Point

विभाग