Rajinikanth: थलायवा रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; फोटो पाहून नेटकरी म्हणाले…
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rajinikanth: थलायवा रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

Rajinikanth: थलायवा रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

Mar 19, 2023 08:41 AM IST

Rajinikanth Photos: मनोरंजन विश्वाचे थलायवा अर्थात चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली.

Rajinikanth at Matoshree
Rajinikanth at Matoshree

Rajinikanth Photos: मनोरंजन विश्वाचे थलायवा अर्थात चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. रजनीकांत शुक्रवारी मुंबईत आले होते. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर रजनीकांत यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मातोश्रीवर पुन्हा एकदा रजनीकांतजींना भेटून खूप आनंद झाला.'

या फोटोंमध्ये उद्धव ठाकरेंसोबतच त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, त्यांची दोन्ही मुलं आदित्य आणि तेजसही फ्रेममध्ये दिसत आहेत. यावेळी रजनीकांत यांना एक सुंदर पुष्पगुच्छही देण्यात आला होता. या फोटोमध्ये मागे शिवसेनेचे सुप्रिमो बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही राजकीय बैठक नव्हती. रजनीकांत यांचे मुंबईत येणे झाल्याने त्यांनी ही भेट घेतल्याचे म्हटले जात आहे.

रजनीकांत आणि ठाकरे कुटुंबीयांचे संबंध खूप चांगले असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा रजनीकांत काही कामानिमित्ताने मुंबईत येतात, तेव्हा ते मातोश्रीवर जातात आणि ठाकरे कुटुंबाची भेट घेतात. अभिनेते रजनीकांत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे चाहते आहेत, असेही म्हटले जाते. आदित्य ठाकरेंच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, ‘मातोश्रीची ताकद’. तर, आणखी एकाने लिहिले की, 'सुपर-डुपर.' दुसऱ्या एकाने 'मातोश्रीवर थलायवा' असे लिहिले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शुक्रवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यालाही रजनीकांत यांनी हजेरी लावली होती. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. यादरम्यान रजनीकांत यांनाही सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर एमसीआयने देखील काही फोटो रिलीज केले होते. यावेळी रजनीकांत अमोल काळेसोबत पोज सेशन करताना देखील दिसले होते.

Whats_app_banner