मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Money Laundering : अभिनेत्री सुकेशला भेटायला यायच्या अन् मिठाईच्या डब्यातून पैसे न्यायच्या!
Sukesh Chandrashekhar
Sukesh Chandrashekhar

Money Laundering : अभिनेत्री सुकेशला भेटायला यायच्या अन् मिठाईच्या डब्यातून पैसे न्यायच्या!

25 January 2023, 14:26 ISTHarshada Bhirvandekar

Sukesh Chandrashekhar Money Laundering: सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी तुरुंगात येणाऱ्या अभिनेत्री मिठाईच्या बॉक्समध्ये पैसे घेऊन परत जात होत्या, असा मोठा खुलासा झाला आहे.

Sukesh Chandrashekhar Money Laundering: सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सातत्याने अपडेट्स समोर येत आहेत. या प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सुकेश चंद्रशेखरला भेटण्यासाठी तुरुंगात येणाऱ्या अभिनेत्री मिठाईच्या बॉक्समध्ये पैसे घेऊन परत जात होत्या. सुकेश चंद्रशेखरच्या स्पेशल वॉर्डमध्ये एक आलिशान ऑफिस बांधण्यात आले होते, ज्यामध्ये रॅक आणि फ्रीजमध्ये मिठाईचे अनेक बॉक्स ठेवण्यात आले होते.

ट्रेंडिंग न्यूज

सुकेशला भेटायला कुणीही जायचे, तेव्हा मिठाईचे हे डबे त्यांच्या समोर यायचे. पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, सुकेश या मिठाईच्या डब्यांमधून लोकांना पैसे देत असे. सुकेशला भेटायला आलेल्या अनेक अभिनेत्रींनी अशा डब्यांमधून पैसे दिले जायचे. या आरोपपत्रानुसार, जेव्हा अभिनेत्री तिहारमध्ये सुकेशला भेटायला जायच्या तेव्हा चंद्रा बंधू अर्थात संजय आणि अजय हे तिथे उपस्थित असायचे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुकेशने पिंकी आणि इतर अभिनेत्रींना मिठाईच्या बॉक्समधून पैसेही दिले होते.

अभिनेत्रींनी देखील सुकेशला मिठाईच्या डब्यांमधून नोटांचे बंडल काढताना पाहिल्याचेही मान्य केले. सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेहीसह बॉलिवूड अभिनेत्रींना महागडे गिफ्ट दिले आहेत. नुकतेच सुकेश चंद्रशेखर याने देखील एक पत्र लिहून काही खुलासे केले होते. त्यात त्याने नोरा फतेहीचे नाव घेत अनेक गुपिते उघड केली होती. कोणत्याही परिस्थितीत सुकेश मला त्याची गर्लफ्रेंड बनवू इच्छित होता, असा आरोप नुकताच नोराने केला होता. यानंतर सुकेशने मीडियाला हे पत्र लिहिले होते.

सुकेशने आपल्या पत्रात खुलासा केला होता की, नोरा फतेही जॅकलिनवर नाराज होती आणि मी जॅकलिनला सोडावे, असे तिला वाटत होते. मीडिया रिपोर्टनुसार, सुकेश म्हणाला की, 'जॅकलिन आणि मी नात्यात होतो आणि त्यामुळेच नोरा जॅकलिनवर चिडायची. नोराने मला जॅकलिनविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. नोराची इच्छा होती की, मी जॅकलिनला सोडून तिला डेट करावे.’ सध्या या प्रकरणात रोजच नवनवे खुलासे होत आहेत.

विभाग