मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jaggu Ani Juliet: जय महाराष्ट्र! मी मराठी प्लस तू पण मराठी; ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर प्रदर्शित
जग्गू आणि जुलिएट
जग्गू आणि जुलिएट (HT)

Jaggu Ani Juliet: जय महाराष्ट्र! मी मराठी प्लस तू पण मराठी; ‘जग्गू आणि जुलिएट’चा ट्रेलर प्रदर्शित

25 January 2023, 14:06 ISTAarti Vilas Borade

Jaggu Ani Juliet Trailer: ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ वर्सोव्यामध्ये राहणाऱ्या एका मुलाची भूमिका साकारत आहे.

मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून अमेय वाघ ओळखला जातो. त्याने अभिनयाच्या आणि विनोदी भूमिकांच्या जोरावर स्वत:ची अशी वेगशी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच त्याचा ‘जग्गू आणि जुलिएट’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘जग्गू आणि जुलिएट’ चित्रपटाच्या ३ मिनिटे ६ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये अमेय वाघचा एकदम हटके अंदाज पाहायला मिळत आहे. तर वैदेहीच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. चित्रपटात अमेय वाघ हा वर्सोव्यामधील एका आग्री-कोळी मुलाची भूमिका साकारत आहे. तर जुली अतिशय सुशिक्षीत घरातून आलेली मुलगी दाखवण्यात आली आहे. ती भारतात फिरायला आली आहे. तिची भेट अमेयशी होते त्यानंतर ते एकत्र फिरतात. चित्रपटाचा ट्रेलर उत्सुकता वाढवणारा आहे. त्यामुळे सर्वजण चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे.
वाचा: भर कार्यक्रमात तब्बूनं घेतलं अजय देवगणचं चुंबन; व्हिडीओ व्हायरल

ट्रेलरमध्ये अमेय वाघच्या बोलण्याच्या शैलीने सर्वांची मने जिंकली आहेत. तर वैदेहीचा ब्रिटीश अॅक्सेंट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दोघांनी चित्रपटासाठी भाषेवर विशेष महेतन घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला 'जग्गू आणि जुलिएट' हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला आपल्या भेटीस येणार आहे.न