मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Viral Video: मेट्रोमध्ये भर गर्दीत ‘मंजुलिका’चा धुडगूस; व्हिडीओमागचं सत्य ऐकलंत का?
Viral Video
Viral Video

Viral Video: मेट्रोमध्ये भर गर्दीत ‘मंजुलिका’चा धुडगूस; व्हिडीओमागचं सत्य ऐकलंत का?

25 January 2023, 13:47 ISTHarshada Bhirvandekar

Manjulika Viral Video in Metro: या व्हिडीओमध्ये 'भूल भुलैया' चित्रपटातील मंजुलिकाचा वेश परिधान केलेली मुलगी नोएडा मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना घाबरवत आहे.

Manjulika Viral Video in Metro: आजकाल देशभरात मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मात्र, मेट्रो केवळ प्रवासाचे साधन राहिलेले नसून, मेट्रोमध्ये रील बनवण्याचा ट्रेंड वाढत आहे. मेट्रोत कधी कोणी खतरनाक स्टंट करतं, तर कधी विचित्र डान्स मूव्ह्स करताना दिसतं. मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर दररोज पाहायला मिळतात. दररोज असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मंजुलिकाचा अवतार धारण करून प्रवाशांना घाबरवताना दिसत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ ग्रेटर नोएडातील मेट्रोचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये 'भूल भुलैया' चित्रपटातील मंजुलिकाचा वेश परिधान केलेली मुलगी नोएडा मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांना घाबरवत आहे. हा व्हिडीओ पाहून सगळ्यांनाच आधी मोठा धक्का बसत आहे.

'मंजुलिका'ची वेशभूषा केलेली ही मुलगी आरडाओरडा करून लोकांच्या मनात भीती निर्माण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 'मंजुलिका' बनलेल्या या मुलीला पाहून लोक घाबरून आपली जागा सोडून इकडे-तिकडे धावत असल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये काही लोक घाबरलेले दिसत आहेत, तर काही आश्चर्यचकित झालेले दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये एक माणूस इअरफोन घालून काहीतरी पाहण्यात गुंग असल्याचे दिसतो, पण 'मंजुलिका' बनलेल्या या मुलीला पाहून तो तिथून पळ काढतो. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नोएडा ते ग्रेटर नोएडा मेट्रोच्या एक्वा लाइनचा आहे. पुढे व्हिडीओमध्ये दिसत आहे की, यावेळी ही मुलगी काही विचित्र कृत्य करत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

‘मंजुलिका’चा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नोएडा मेट्रोरेल कॉर्पोरेशनकडे चौकशीची मागणी झाली होती. मेट्रो कॉर्पोरेशनने केलेल्या तपासणीत समोर आलेले तथ्य वेगळेच होते. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा व्हायरल व्हिडीओ मेट्रोच्या कोचमध्ये पार पडलेल्या एका शूटिंग दरम्यानचा आहे. या व्हिडीओत काही बदल करून तो व्हायरल करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

विभाग