मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Leena Nagwanshi: तुनिषानंतर आणखी एका स्टारने उचललं टोकाचं पाऊल; अवघ्या २२व्या वर्षी संपवलं आयुष्य

Leena Nagwanshi: तुनिषानंतर आणखी एका स्टारने उचललं टोकाचं पाऊल; अवघ्या २२व्या वर्षी संपवलं आयुष्य

Harshada Bhirvandekar HT Marathi
Dec 28, 2022 07:28 AM IST

Leena Nagwanshi died : सोशल मीडिया स्टार लीना नागवंशी हिने अवघ्या २२व्या वर्षी आपलं आयुष्य संपवलं आहे.

Leena Nagwanshi
Leena Nagwanshi

Leena Nagwanshi died : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. या घटनेला काही दिवसच उलटत असताना आता आणखी एका अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचललं आहे. छत्तीसगडमधील लोकप्रिय सोशल मीडिया स्टार लीना नागवंशी हिने देखील आत्महत्या केली आहे. लीनाच्या मृत्यूचा तपास छत्तीसगडचे पोलीस करत आहेत. २२ वर्षीय लीना नागवंशी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय होती. छोटे व्हिडीओ आणि रील्स बनवून ती सोशल मीडियावर शेअर करायची.

ट्रेंडिंग न्यूज

या संदर्भात माहिती देताना छत्तीसगडचे पोलीस उपनिरीक्षक इंगेश्वर यादव म्हणाले की, १ वाजताच्या सुमारास लीनाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आम्हाला कळले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत कुटुंबीयांनी तिचा मृतदेह खाली उतरवला होता. त्यानंतर लीनाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. लीना सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध असून, तिने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सोशल मीडियावर खळबळ माजली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनास्थळी कोणतीही चिट्ठी सापडली नाही. त्यामुळे या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तर, लीनाचा कुणाशीही वाद नव्हता, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. मृत्युच्या अवघ्या २ दिवस आधी लीनाने सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये ती खूप खूश दिसत होती. तिने आनंदाने ख्रिसमस साजरा केला होता. मात्र, तिने अचानक उचलेल्या या पावलामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

छत्तीसगडमध्ये राहणारी लीना नागवंशी बीकॉमच्या तिसऱ्या वर्षात शिकत होती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. लीनाच्या अकाली मृत्यूमुळे तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

IPL_Entry_Point

विभाग