मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth-Kiara Wedding Video: लाल कपड्यांमध्ये शोभून दिसली नवविवाहित जोडी; ‘असा’ झाला कियाराचा गृहप्रवेश!

Sidharth-Kiara Wedding Video: लाल कपड्यांमध्ये शोभून दिसली नवविवाहित जोडी; ‘असा’ झाला कियाराचा गृहप्रवेश!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2023 09:51 AM IST

Sidharth-Kiara Wedding Video: बॉलिवूडच्या या नवविवाहित जोडप्याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे.

Sidharth-Kiara Wedding
Sidharth-Kiara Wedding

Sidharth-Kiara Wedding Video: बॉलिवूडची क्युट जोडी सिद्धार्थ-कियारा नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी लग्नानंतर जैसलमेरहून थेट दिल्ली गाठले आहे. आता बॉलिवूडच्या या नवविवाहित जोडप्याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये हे कपल खूपच क्यूट दिसत आहे. दोघांनीही लाल रंगाचे कपडे परिधान केले होते. कियारा लाल सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. विमानतळावर स्पॉट झाल्यानंतर या जोडीने पापाराझींना देखील मिठाई वाटली.

कियारा आणि सिड लाल रंगाच्या या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होते. कियाराने यावेळी लाल रंगाचा एथनिक सूट परिधान केला होता. यासोबत तिने गोल्डन हिल्स परिधान केल्या होत्या. तर, नवरदेव सिद्धार्थने लाल कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला होता. यासोबतच सिद्धार्थने त्याच्या गळ्यात पांढरी शाल घातली होती, जी त्याच्या लूकवर शोभून होती. यावेळी कियारा आणि सिद्धार्थने कॅमेऱ्यासमोर फोटो पोज देखील दिल्या.

जोधपूरमध्ये लग्नानंतर कियारा अडवाणी आता थेट पती सिद्धार्थ मल्होत्राच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी दिल्लीत आली आहे. दिल्लीत आता दोघेही मोठे रिसेप्शनच्या देणार आहेत. यात बॉलिवूडचे अनेक बडे कलाकार सामील होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाचे रिसेप्शन ९ फेब्रुवारीला दिल्लीत होणार आहे.

या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या दिवशी सुप्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राचे पोशाख परिधान केले होते. कियारा यावेळी गुलाबी लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. तिने तिच्या लूकला पन्ना आणि डायमंड नेकपीस, मॅचिंग कानातले आणि मांग टिकासह पूर्ण केले होते. तर, सिद्धार्थ क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच राजबिंडा दिसत होता.

IPL_Entry_Point