Sidharth-Kiara Wedding: सफेद घोड्यावर स्वार झाला नवरदेव; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याला सुरुवात!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sidharth-Kiara Wedding: सफेद घोड्यावर स्वार झाला नवरदेव; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याला सुरुवात!

Sidharth-Kiara Wedding: सफेद घोड्यावर स्वार झाला नवरदेव; सिद्धार्थ-कियाराच्या लग्नसोहळ्याला सुरुवात!

Published Feb 07, 2023 04:11 PM IST

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्न सोहळ्याला आता सुरुवात झाली असून, थोड्याच वेळात सप्तपदींना देखील सुरुवात होणार आहे.

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding
Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding

Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: सगळ्या चाहत्यांच्या नजरा ज्या लग्नाकडे लागून बसल्या आहेत, ते लग्न आता काहीच वेळात पार पडणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी आता काही क्षणातच लग्न बंधनात अडकणार आहे. या लग्न सोहळ्याला आता सुरुवात झाली असून, थोड्याच वेळात सप्तपदींना देखील सुरुवात होणार आहे. ‘व्हॅलेंटाईन वीक’च्या पहिल्या दिवशी म्हणजेच रोज डेला १२५ पाहुण्यांच्या उपस्थितीत सिद्धार्थ-कियारा त्यांच्या नात्यात पुढचं पाऊल टाकणार आहेत.

अतिशय भव्यदिव्य अशा या राजेशाही थाटात होणाऱ्या या लग्नात १० देशांतील १००हून अधिक स्वादिष्ट पदार्थ पाहुण्यांना सर्व्ह करण्यात येणार आहेत. नुकतेच या ठिकाणी हळदी-मेहंदी, संगीत समारंभ हे कार्यक्रम पार पडले होते. सध्या या किल्ल्याभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, हे ठिकाण सध्या फुलांनी सजवण्यात आले आहे. करण जोहर, शाहिद कपूर, मनीष मल्होत्रा, वरुण धवन, विकी कौशल, ईशा अंबानी, आनंद पिरामल आणि मीरा राजपूत यांसारख्या पाहुण्यांनी सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाला हजेरी लावली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली असून, थोड्याच वेळात सिद्धार्थ पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन आपल्या वरातीसह लग्न मंडपाच्या दिशेने रवाना होणार आहे. नुकताच सूर्यगड पॅलेसच्या बाहेर घोडा आणि वाजंत्री स्पॉट झाले होते. लवकरच लग्नाची वरात कियारापर्यंत पोहोचणार असून, सप्तपदीला सुरुवात होणार आहे.

या सगळ्या जल्लोषादरम्यान कोणतेही फोटो आणि व्हिडीओ बाहेर जाऊ नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे. इतकी कडक सुरक्षा व्यवस्था असताना देखील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. याचाच विचार करून आता पाहुणे आणि किल्ल्यात काम करणार्‍या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईल फोनवर खास प्रकारचे बॅक कव्हर लावले गेल्याचे सांगण्यात येत आहे. या कव्हरमध्ये फोनचे कॅमेरेदेखील बंद झाले आहेत.

Whats_app_banner