मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rahul Roy Birthday : ‘आशिकी’चा हिरो, ‘बिग बॉस’चा विजेता; तरीही बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरला राहुल रॉय!

Rahul Roy Birthday : ‘आशिकी’चा हिरो, ‘बिग बॉस’चा विजेता; तरीही बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरला राहुल रॉय!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 09, 2023 09:24 AM IST

Rahul Roy Birthday: राहुल रॉयने १९९०मध्ये 'आशिकी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. ‘आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

Rahul Roy
Rahul Roy

Rahul Roy Birthday: आशिकी’ फेम बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय याचा आज (९ फेब्रुवारी) ५५वा वाढदिवस आहे. राहुल रॉयने बॉलिवूडमध्ये येताच धमाका केला होता. त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित होताच ब्लॉकबस्टर ठरला आणि राहुल रातोरात सुपरस्टार बनला. परंतु, पहिला चित्रपट हिट ठरल्यानंतरदेखील तो अचानक मोठ्या पडद्यावरून गायब झाला. चाहते आजही राहुलला चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहे.

राहुल रॉयने १९९०मध्ये 'आशिकी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. ‘आशिकी’ हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटातील गाण्यांपासून ते राहुलच्या स्टाईलपर्यंत सगळ्याचेच लोक आजही दिवाने आहेत. राहुलने जेव्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो अवघ्या २२ वर्षांचा होता. त्याला स्वतःला देखील कल्पना नव्हती की, तो पहिल्याच चित्रपटात इतका मोठा स्टार होईल.

चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी राहुलने दिल्लीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. कॉलेजच्या काळातच त्याने मॉडेलिंगला सुरुवात केली होती. राहुल रॉयचा फोटो पाहून महेश भट्ट यांनी त्याला 'आशिकी'मध्ये साइन केले. राहुलचा हा पहिलाच चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला. पण, त्यानंतर त्याला फारसे यश मिळाले नाही. एक वेळ अशीही आली की, तो बॉलिवूड इंडस्ट्रीतून पूर्णपणे गायब झाला होता.

पहिल्याच चित्रपटानंतर मोठा स्टार बनलेल्या राहुल रॉयला पुढील ८ महिन्यांत कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळाली नाही. यावेळी त्याचा संयम सुटत होता. पण, अचानक चित्रपटांच्या ऑफर्सचा पाऊस पडू लागला, तेव्हा दोन आठवड्यात जवळपास ६० चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. यापैकी राहुलने ४७ चित्रपट साईन केले. पण, नंतर शूटिंगसाठी वेळ न मिळाल्याने त्याला अनेक निर्मात्यांचे पैसे परत करावे लागले.

यानंतर पुन्हा एकदा राहुलला काम मिळणे बंद झाले. २००६ मध्ये जेव्हा हातात काहीच चित्रपट नव्हते, तेव्हा राहुल रॉयने टीव्ही रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये एंट्री घेतली होती. हा शो देखील त्याने जिंकला. काही वर्षांपूर्वी कारगिलमध्ये शूटिंग करताना राहुल रॉय ब्रेन स्ट्रोक आला होता. मात्र, यातून तो सुखरूप बाहेर पडला. आता अभिनेता केवळ सोशल मीडियावर सक्रिय असून, जनजागृतीची कामं करताना दिसतो.

IPL_Entry_Point

विभाग