मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gandhi Talks Teaser: दाक्षिणात्य सुपरस्टार विजयसोबत दिसणार मराठमोळा सिद्धार्थ जाधव, टीझर प्रदर्शित

Gandhi Talks Teaser: दाक्षिणात्य सुपरस्टार विजयसोबत दिसणार मराठमोळा सिद्धार्थ जाधव, टीझर प्रदर्शित

Aarti Vilas Borade HT Marathi
Oct 02, 2022 05:32 PM IST

Siddharth Jadhav: नुकताच 'गांधी टॉक्स' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा दाक्षिणात्य चित्रपट मराठी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.

गांधी टॉक्स
गांधी टॉक्स (HT)

आज २ ऑक्टोबर रोडी महात्मा गांधी जयंती आहे. त्यानिमित्ताने एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. लवकरच 'गांझी टॉक्स' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यासोबतच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील दिसणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

ट्रेंडिंग न्यूज

'गांधी टॉक्स' या चित्रपटाच्या १ मिनिटे २७ सेकंदाच्या टीझरमध्ये विजय सेतुपती, सिद्धार्थ जाधव, अरविंग स्वामी आणि अदिती राव हैदरी यांच्या हातात पैसे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या सगळ्यांकडे गांधीजींची तीन माकडे वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट पाहू नका असल्याचे दिसत आहे. पण विजय सेतूपतीकडे खेळण्यातील माकड दाखवण्यात आले आहे. त्यामुळे विजय सेतुपती चित्रपटात ट्वीस्ट आणणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
वाचा: मिका सिंगने खरेदी केले खासगी बेट, शेअर केला व्हिडीओ

'गांधी टॉक्स' हा डार्क कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचे नाव जरी गांधी टॉक्स असले तरी हा एक सायलेंट चित्रपट आहे. म्हणजे चित्रपटातील कलाकार आणि त्यांच्या भूमिका यामध्ये काही तरी हेतू असणार. केवळ इशाराऱ्याने आणि हवभावाने एकमेकांशी संवाद साधला जाणार आहे.

'गांधी टॉक्स' या चित्रपटात विजय सेतुपती, सिद्धार्थ जाधव, अरविंग स्वामी आणि अदिती राव हैदरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाला ए आर रहमानने संगीत दिले आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड, हिंदी, मल्याळम आणि मराठी भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अद्याप स्पष्ट झालेली नाही.

IPL_Entry_Point

विभाग