मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shilpa Shetty: अक्षय कुमारने माझा वापर केला आणि...; शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा

Shilpa Shetty: अक्षय कुमारने माझा वापर केला आणि...; शिल्पा शेट्टीने केला होता धक्कादायक खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 20, 2022 04:00 PM IST

Akshay Kumar: ९०च्या दशकात शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी ‘मैं ख‍िलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटात एकत्र काम केले.

शिल्पा शेट्टी
शिल्पा शेट्टी (HT)

बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. एकेकाळी तो त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असायचा. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण एक दिवस अचानक अक्षयने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. ते पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारसोबतच्या अफेअरवर वक्तव्य केले होते.

ट्रेंडिंग न्यूज

शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारने ‘मैं ख‍िलाड़ी तू अनाड़ी’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर अक्षय आणि शिल्पाच्या अफेअरच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण २००० साली त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर अक्षयने २००१ साली अभिनेत्री ट्विंकल खन्नाशी लग्न केले.
वाचा : ‘बुरखा परिधान कर आणि...', लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख सर्वांसमोर गौरीला म्हणाला अन्...

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये शिल्पाला अक्षयसोबतच्या अफेअरवर काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा पहिल्यांदाच तिने यावर वक्तव्य केले होते. जेव्हा अक्षय शिल्पा सोबत रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा तो ट्विंकल खन्नालाही डेट करत होता असा धक्कादायक खुलासा शिल्पाने केला होता.

अक्षयसोबतच्या अफेअर विषयी सांगताना शिल्पाच्या डोळ्यात पाणी आले होते. ती म्हणाली, 'अक्षयने केवळ माझा वापर केला. आम्ही दोघे रिलेशनशीपमध्ये होतो. पण जेव्हा त्याच्या आयुष्यात दुसरी अभिनेत्री आली तेव्हा त्याने मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे ज्याचा मला प्रचंड राग येतो. कारण त्याने फसवले.'

IPL_Entry_Point

विभाग