मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘बुरखा परिधान कर आणि...', लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख सर्वांसमोर गौरीला म्हणाला अन्...

‘बुरखा परिधान कर आणि...', लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुख सर्वांसमोर गौरीला म्हणाला अन्...

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 19, 2022 04:34 PM IST

शाहरुख आणि गौरीने १९९१ साली लग्न केले. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुखने गौरीच्या कुटुंबीयांसोबत एक प्रॅक केला होता. स्वत: शाहरुखने फरीदा जलाल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता.

गौरी खान
गौरी खान (HT)

बॉलिवूडमधील एक आदर्श कपल म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्याकडे पाहिले जाते. ते कायम चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाला जवळपास २९ वर्षे झाली आहेत. पण शाहरुख आणि गौरी यांच्या लग्नाता अनेक अडचणी आल्या होत्या. कारण गौरी ही पंजाबी कुटुंबीतून आहे तर शाहरुख हा मुस्लिम कुटुंबातून. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांनी नकार दिला होता. दरम्यान शाहरुखने एक किस्सा सांगितला होता. तो ऐकून सर्वांना हसू अनावर झाले होते.

शाहरुख आणि गौरीने १९९१ साली लग्न केले. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये शाहरुखने गौरीच्या कुटुंबीयांसोबत एक प्रॅक केला होता. स्वत: शाहरुखने फरीदा जलाल यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता.
वाचा : सुशांत सिंहचा खून झाला; आमिर खानच्या भावाचा खळबळजनक दावा

'आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला अनेकजण आले होते. त्यामध्ये गौरीचे संपूर्ण कुटुंब, ओल्ड फॅशन लोक देखील होते. मी सगळ्यांचा आदर करतो. आम्ही तेथे उशिराच पोहोचलो होतो. तेथे सगळ्यांमध्ये मी एकटाच मुस्लिम होतो. त्याच वेळी तिथे अनेक चर्चा सुरु होत्या. गौरी धर्म बदलणार का? ती मुस्लिम धर्म स्वीकारणार का? ती तिचे नाव बदलणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित असलेल्या लोकांना पडले होते' असे शाहरुख म्हणाला.

पुढे मजेशीर अंदाजात शाहरुख म्हणाला, 'या चर्चा माझ्यावर कानावर पडत होत्या. मी ते सगळं ऐकून गौरी बुरखा घाल आणि चल नमाज पठण करुया असे म्हटले. ती पुढे लगेच म्हणालो आता गौरी रोज बुरखा घालून फिरणार. आम्ही तिचे नाव बदलून आयशा ठेवणार असे देखील म्हटले. ते ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना आश्चर्य वाटले.' पण नंतर शाहरुख हे सगळं मस्करीत बोलला असल्याचे कळाल्यानंतर सर्वांना हसू अनावर झाले होते.

IPL_Entry_Point

विभाग